परखड नेतृत्व अजितदादा
By admin | Published: July 21, 2014 11:07 PM2014-07-21T23:07:01+5:302014-07-21T23:07:01+5:30
महाराष्ट्रातील युवकांचे नेतृत्व म्हणून नामदार अजितदादा यांच्याकडे आजची पिढी पाहत आह़े आपले आचार विचार आणि कर्तृत्वातुन ना़ दादांनी हे स्थान मिळविले आह़े
Next
महाराष्ट्रातील युवकांचे नेतृत्व म्हणून नामदार अजितदादा यांच्याकडे आजची पिढी पाहत आह़े आपले आचार विचार आणि कर्तृत्वातुन ना़ दादांनी हे स्थान मिळविले आह़े म्हणुनच राज्याच्या काणाकोप:यातुन कार्यकर्ता आपले गा:हाणो ना़ दादा जिथे असतील, जिथे भेटतील, तिथे त्यांना गाठुन सांगतो कारण त्या सर्वाचा ‘‘विश्वास’’ ते आहेत असंख्य कार्यकत्र्याची ते ‘नव संजीवनी’ आहेत़ नामदार दादांच्या कार्यशैलीचे एक वैशिष्टय़ म्हणजे जे जे म्हणून विकासाचे कार्य करायचे ते, ते कार्य त्यांनी जीव ओतून करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आह़े त्यांच्या प्रत्येक कृती मागे एक ठाम विचार असतो़
जेथे दादा, तेथे गर्दी, अतिशय परखड शब्दांत बोलणारे, काम होणार असेल तर होणार आणि नसेल होणार तर होणार नाही असे स्पष्ट बजावणारे दादा. सामान्य माणूस जेव्हा येवून बजावणारे दादा. सामान्य माणूस जेव्हा येऊन आपले काम करू घेतो, तेव्हा ते स्वत:ला धन्य समजून मनातील आनंद लपविता येत नाही. असा माघारी जातो, तेव्हा कार्यकत्र्यानादेखील त्याचे समाधान वाटते. समोर हजारोंची गर्दी असली तरी भराभर कामे करण्याची ताकद याच नेत्यामध्ये इतके-तिकडे करण्याचे धाडस करत नाही. कामे मार्गी लावत असताना त्या कार्यकत्र्याना त्याची जाणीव करून दिली जाते. शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम हातळत असताना चूक होणार नाही, याची दक्षता घेतली जाते. हे कोणाला सांगायची गरज नाही कामाच्या माध्यमातून आपले नेतृत्व सर्वाधिक वेगवान, गतिमान बनविले परिणामी विकासाची गंगा तालुक्यातील जिल्ह्यातील आणताना इतरांनाही त्याच्यापासून प्रेरणा घ्यावी असे स्वच्छित वाटत असेल, यात नवल नाही. विकास नुसते मंजूर करू शांत न बसता प्रत्यक्ष त्या कामावर जाऊन पाहणी करणो फोनवरून माहिती घेणो यासारख्या बाबी इतक्या जलद घडत असतात की, त्यामुळे अधिकारी देखील तत्पर राहतात. त्यांना कामात काहीह चूका असतील तर त्या स्पष्टपणो लक्षात आणून दिल्या जातात. दुरुस्त्याही केल्या जातात. पटले नाही तर फेररचना करतात.
ज्या ठिकाणी जातील तेथे दादा डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक यासारख्या भूमिकेत आहेत असे लोकांच्या सहज लक्षात येते. अशा कर्तृत्ववान नेता आम्हा बारामतीकरांना मिळाला हे आमचे सदभाग्य! राजकारण म्हणून प्रत्येक गोष्टीा पाहत नाहीत समाजकारणाचा जोर अधिक असतो. जिद्द व चिकाटीने काम करीत असताना तेवढाच प्रचंड लोकसंपर्क वाढला आहे. कोणत्याही कार्यक़त्र्यापा सहज नावाने हाक मारणो त्याचे काम केले असे सांगणो हे सर्व सहज करतात. गावा-गावातील विकासकामे करताना विशेषत: प्राथमिक शाळा, सार्वजनिक सभागृह, बँक, मंदिर आदी इमारती उभ्या करण्याचे वेड लावून घेतले आहे. याच इमारतीमधून उद्याची आदर्श पिढी निर्माण होणार याची जाण ठेवून त्यांनी यावरती प्रचंड लक्ष केंद्रीत केले आहे. उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली असताना तालुक्याकडे लक्ष कमी पडू नये यासाठी शैक्षणिक क्षेत्र असो अथवा ग्रामविकासाचे काम असो त्यासाठी काटेवाडीची स्नुषा सुनेत्रवहिनी पवार आता खंबीरपणो उभ्या आहेत.
या गोष्टीकडे त्या लक्ष देत आहेत. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सुनेत्र वहिनीने केलेले काम एक प्रकारेच वेगळी दिशा दाखवत आहे. राज्यात अतुलनीय ठरले आहे. अशा प्रकारे सर्वदूर असणा:या पवार कुटुंबियांमुळेच बारामतीचे नाव अग्रस्थानी आहे. उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना धडाकेबाज नेतृत्व म्हणून अजितदादांनी आपली ओळख निर्माण केली आहे. सामान्य कार्यकत्र्यालाच नव्हे तर मंत्री अधिकारी, पदाधिकारीदेखील त्यांच्या स्पष्टोक्तीपणामुळेच आदरयुक्ती भिती बाळगुन असतात. झपाटय़ाने विकासकामे करताना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी ते स्वत: घेतात. त्यामुळे एक विकासरत्न या महाराष्ट्राला लाभपे आहे. त्यामुळे याचा आम्ही बारामतीकरांना सार्थ अभिमान आहे. दादांना वाढदिवसाच्या पुन्हा हार्दिक शुभेच्छा!