पार्ले बिस्कीटचा विलेपार्ल्यातील कारखाना बंद
By Admin | Published: July 27, 2016 04:46 PM2016-07-27T16:46:39+5:302016-07-27T16:46:39+5:30
पार्ले-जी या प्रसिद्ध बिस्कीटचा मुंबईतील विलेपार्ले येथील कारखाना बंद झाला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - पार्ले-जी या प्रसिद्ध बिस्कीटचा मुंबईतील विलेपार्ले येथील कारखाना बंद झाला आहे. उत्पादनक्षमता कमी झाल्यामुळे पार्लेचे मालक विजय चौहान यांना पार्ल्यातील कारखाना बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
पार्लेची एकूण उलाढाल दहा हजार कोटींची आहे. कारखाना बंद व्हायच्यावेळी उत्पादन अत्यंत नग्णय होते. अशा परिस्थितीत कारखाना सुरु ठेवणे व्यवहार्य ठरणार नाही असे पार्ले प्रोडक्टसच्या अरुप चौहान यांनी सांगितले. पार्लेचे देशभरात कारखाने असून, बिस्कीट तशीच अन्य उत्पादने आहेत.
कारखाना बंद होताना ३०० कामगार होते त्या सर्वांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. मुंबईत पार्लेचा कारखाना महत्वाच्या ठिकाणावर असून तिथे जमिनीला चांगला भाव आहे. काही एकरमध्ये हा कारखाना पसरला आहे. पार्ल्यामध्ये एका चौरसफुटाचा दर २५ ते २८ हजार रुपये आहे. पार्लेचा कारखाना १९२९ मध्ये विलेपार्लेमध्ये सुरु झाला. १९३९ मध्ये तिथे बिस्कीटांचे उत्पादन सुरु झाले