राज्यातील साडेपाच हजारांवर कैद्यांना पॅरोल, फर्लोचा दे धक्का

By admin | Published: October 12, 2016 08:28 PM2016-10-12T20:28:29+5:302016-10-12T20:28:29+5:30

दहशतवादी कृत्य, दरोडा, जबरी चोरी, फसवणूक, अमली पदार्थांची तस्करी यासह बलात्कार, खून यासारख्या गुन्ह्यांमध्ये कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या

Parole in the state, 500 paraol prisoners push | राज्यातील साडेपाच हजारांवर कैद्यांना पॅरोल, फर्लोचा दे धक्का

राज्यातील साडेपाच हजारांवर कैद्यांना पॅरोल, फर्लोचा दे धक्का

Next

- सचिन राऊत/ ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 12 - दहशतवादी कृत्य, दरोडा, जबरी चोरी, फसवणूक, अमली पदार्थांची तस्करी यासह बलात्कार, खून यासारख्या गुन्ह्यांमध्ये कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना पॅरोल आणि फर्लोची सुट्टी न देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने राज्यातील कारागृहात असलेल्या साडे पाच हजारांवर कैद्यांना याचा फटका बसला आहे.
कारागृहामध्ये शिक्षा भोगत असताना मुलगा-मुलीचा विवाह, जवळच्या नातेवाइकांचा मृत्यू यासारख्या कारणांमुळे कैद्यांना पॅरोल आणि फर्लो या रजा मंजूर करण्यात येतात; मात्र या कैद्यांना पॅरोल व फर्लो दिल्यानंतर गंभीर गुन्ह्यांतील कैदी कारागृहात परत आलेच नसल्याचे प्रकार उजेडात आले आहेत. अकोल्यात गत सहा महिन्यांत अशा प्रकारची पाच प्रकरणे उघडकीस आली असून, हे कैदी अमरावती आणि नागपूर कारागृहातून सुटी घेतल्यानंतर परतच गेले नव्हते, त्यामुळे कैद्यांना दिल्या जाणाऱ्या या सुट्ट्यांबाबत सरकारने धोरण आणखी कडक केले आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा धाक बसविण्यासाठी बलात्कार, खून, दरोडा, लहान मुलांचे अपहरण, मानवी तस्करी, अमली पदार्थांची तस्करी व दहशतवादी कृत्यात शिक्षा झालेल्या कैद्यांना यापुढे पॅरोल आणि फर्लोची सुट्टी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या पाच हजार ८०० कैद्यांना यापुढे पॅरोल आणि फर्लोची सुटी मिळणार नाही. राज्यातील कारागृहात खून प्रकरणात ५ हजार २०० कैदी शिक्षा भोगत असून, बलात्काराच्या गुन्ह्यांत २३६, दरोड्याच्या गुन्ह्यांत १२३ आणि अमली पदार्थांच्या गुन्ह्यांत ८४ कैदी शिक्षा भोगत आहेत. यासोबतच दहशतवादी कृत्य व लहान मुलांच्या अपहरणात सुमारे पन्नास कैदी शिक्षा भोगत आहेत.

Web Title: Parole in the state, 500 paraol prisoners push

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.