पिंपरी-चिंचवड : कृषी सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर ट्रॉली उलटली; २३ विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 09:28 PM2017-12-15T21:28:24+5:302017-12-15T21:34:22+5:30

शालेय प्रकालांतर्गत कृषी पर्यटनासाठी गेलेल्या शालेय सहलीत ट्रॅक्टर मधून फेरफटका मारताना ट्रॉली पलटून झालेल्या दुर्घटनेत सुमारे २३मुले जखमी झाली आहेत. त्यातील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे तर अन्य किरकोळ जखमी विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे   

Parri-Chinchwad: A tractor trolley was dropped for the students traveling to the Agriculture Cooperative; 23 students injured | पिंपरी-चिंचवड : कृषी सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर ट्रॉली उलटली; २३ विद्यार्थी जखमी

पिंपरी-चिंचवड : कृषी सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर ट्रॉली उलटली; २३ विद्यार्थी जखमी

Next
ठळक मुद्देदोघे विद्यार्थी गंभीर; पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली दगड आल्याने घडली दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (वाकड) : शालेय प्रकालांतर्गत कृषी पर्यटनासाठी गेलेल्या शालेय सहलीत ट्रॅक्टर मधून फेरफटका मारताना ट्रॉली पलटून झालेल्या दुर्घटनेत सुमारे २३मुले जखमी झाली आहेत. त्यातील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे तर अन्य किरकोळ जखमी विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे   
वाकड येथील इंदिरा नॅशनल स्कुलची ही सहल शुक्रवारी सकाळी गेली होती सहलीत हा अपघात घडला असून, दोघा विद्यार्थ्यावर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू अ सून  इतर २१ जणांवर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार करून ते किरकोळ जखमी असल्याने त्यांना सोडण्यात आले अपघाताची माहिती कळताच पालकांनी हॉस्पिटल्समध्ये धाव घेतली. पुना हॉस्पिटलच्या बाहेर पालकांनी गर्दी केली होती.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी, इंदिरा स्कुलची सहल पुणे-सासवड रस्त्यावरील गरड गावाजवळ गिरीवन येथील इडन ऑफ व्हॉइसेस फार्म येथे गेली होती. कृषी पर्यटनासाठी गेलेल्या सहलीत ट्रॅक्टरमधून फेरफटका मारण्याची सुविधा फार्म मार्फत करून देण्यात आली आहे सहलीत पाच बसेस मधून ६ वी ते १० वी पर्यंतचे सुमारे २५० विद्यार्थी गेले होते. इतरांच्या फेऱ्या झाल्यानंतर शेवटच्या फेरीवेळी ट्रॅक्टर ट्रॉलीखाली मोठा दगड आल्याने ट्रॉली पलटली. ट्रॉली अंगावर पडून अनेक मुले जखमी झाली. दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात घडला. घटनास्थळावरून मुलांना पुण्यातील हॉस्पिटल्समध्ये हलविण्यात आले. 
याबाबत स्कुलच्या मुख्याध्यापिका गीता पिल्ले यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या हा एक अपघात आहे इतर सर्व विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना सोडले आहे तर दोन विद्यार्थी इतरांपेक्षा थोडे अधिक जखमी असल्याने काळजी म्हणून आम्ही त्यांना आयसीयुत ठेवण्यास सांगितले आहे चिंता कारण्यासारखे काहीही नाही

Web Title: Parri-Chinchwad: A tractor trolley was dropped for the students traveling to the Agriculture Cooperative; 23 students injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.