‘सेल्फी विथ ट्री’साठी पारसची निवड
By admin | Published: October 8, 2016 02:37 AM2016-10-08T02:37:30+5:302016-10-08T02:37:30+5:30
राज्य सरकार व वन विभागाच्या पुढाकाराने १ जुलै रोजी २ कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम राबवण्यात आला.
विक्रमगड : राज्य सरकार व वन विभागाच्या पुढाकाराने १ जुलै रोजी २ कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी वन विभागाने वृक्ष लावतानाचे छायाचित्र वेबसाइटवर अपलोड करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यभरातून हजारोंच्या संख्येने छायाचित्रे वन विभागाला प्राप्त झाली. राज्याचे मुख्य वनसंरक्षक यांनी राज्यभरातून २३ व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यात पालघर जिल्ह्यातून जव्हार येथील युवक पारस संजय सहाणे यांची निवड करण्यात आली आहे.
१ जुलै २०१६ रोजी शासनाने राज्यभरात २ कोटी वृक्षलागवडीचा उपक्र म राबवला होता. या उपक्र माला प्रोत्साहन मिळावे, यासाठी वन विभागाने सेल्फी विथ ट्री या स्पर्धेंतर्गत झाड लावतानाचे छायाचित्र म्हणजे हे वेबसाइट पत्त्यावरचे २ मोबाइल क्रमांक देण्यात आले होते. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने छायाचित्रे वन विभागाला प्राप्त झाली. राज्याचे मुख्य वनसंरक्षक यांच्या उपस्थितीत राज्यभरातून २३ व्यक्तींची निवड करण्यात आली. यात पालघर जिल्ह्यातून जव्हार येथील युवक पारस संजय सहाणे यांची निवड करण्यात आली आहे. विजेत्यांना जिल्हास्तरावर कार्यक्र म घेऊन गौरवण्यात येणार आहे. (वार्ताहर)
>सध्याच्या काळात निसर्गाची काळजी घेण्याची गरज आहे. निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा तोटा मनुष्याला होईल, म्हणून सर्वांनी निसर्गाची हानी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. तसेच माझी निवड केली, त्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो व वन विभागाच्या उपक्रमात नेहमी माझा असाच सहभाग राहील.
- पारस संजय सहाणे, जव्हार