पार्टीला जाणे मॉडेलला पडले महागात

By admin | Published: July 5, 2017 04:56 AM2017-07-05T04:56:45+5:302017-07-05T04:56:45+5:30

मैत्रिणीसोबत एका पार्टीला जाणे मॉडेलला चांगलेच महागात पडले आहे. मित्रांकडून तिच्यावर जबरदस्ती करण्यात आल्याचे उघड झाले

The party went to the model to fall in the price | पार्टीला जाणे मॉडेलला पडले महागात

पार्टीला जाणे मॉडेलला पडले महागात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मैत्रिणीसोबत एका पार्टीला जाणे मॉडेलला चांगलेच महागात पडले आहे. मित्रांकडून तिच्यावर जबरदस्ती करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
पीडित मॉडेल आपल्या मैत्रिणीसोबत एका हॉटेलमध्ये आयोजिलेल्या पार्टीत सहभागी झाली होती. मात्र त्याच दरम्यान ती नशेत असल्याचा फायदा घेत मैत्रिणीच्या दोन मित्रांनी तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तिने विरोध केला म्हणून तिला मारहाण केली. सदर मॉडेलने कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करीत पळ काढल्याची घटना जुहूमध्ये सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी जुहू पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मालवणी परिसरात तक्रारदार मॉडेल आपल्या कुटुंबीयांसोबत राहते. रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास जुहूतील एका नामांकित हॉटेलमध्ये मैत्रिणीने आयोजिलेल्या पार्टीला ती गेली. तेथील एका खोलीत या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तेथे मैत्रिणीचे ९ ते १० मित्र आधीपासून तळ ठोकून होते.
ती नशेत असल्याचा फायदा घेत मैत्रिणीच्या मित्रांपैकी दोघांनी तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तिने कसेबसे त्यांच्या तावडीतून पळ काढला.

आरोपींचा शोध सुरू

घटनेची वर्दी लागताच जुहू पोलीस तेथे दाखल झाले. तोपर्यंत दोन्हीही आरोपी पसार झाले होते. मॉडेलला रुग्णालयात दाखल केले असून जुहू पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: The party went to the model to fall in the price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.