पडसलगीकरांनी स्वीकारली मुंबईची धुरा

By Admin | Published: February 1, 2016 03:06 AM2016-02-01T03:06:19+5:302016-02-01T03:06:19+5:30

: दहशतवाद, संघटित गुन्हेगारी, सायबर, आर्थिक गुन्हे आणि महिला व ज्येष्ठ नागरिकांबाबत घडणारे गुन्हे रोखणे याला माझे सर्वोच्च प्राधान्य असेल,

Pascalgikar accepted Mumbai's axle | पडसलगीकरांनी स्वीकारली मुंबईची धुरा

पडसलगीकरांनी स्वीकारली मुंबईची धुरा

googlenewsNext

मुंबई : दहशतवाद, संघटित गुन्हेगारी, सायबर, आर्थिक गुन्हे आणि महिला व ज्येष्ठ नागरिकांबाबत घडणारे गुन्हे रोखणे याला माझे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे मुंबईचे नूतन पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांनी म्हटले. रविवारी त्यांनी मावळते आयुक्त अहमद जावेद यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.
पडसलगीकर म्हणाले, की नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी अहमद जावेद यांनी सोशल मीडियाचा वापर सुरू केला होता; मीदेखील तो कायम ठेवणार आहे. मुंबई शहर हे गतिशील असल्यामुळे पोलिसांना नेहमीच सावध राहावे लागते. प्रत्यक्षात बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी हे त्यांच्यावर देखरेख करणाऱ्या वरिष्ठांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी सांगितले.
मुंबई शहराला असलेल्या इसिस कारवायांच्या धोक्याबद्दल विचारले असता पडसलगीकर म्हणाले, की इसिसमध्ये जाण्यापासून काही जणांना रोखण्याचे
काम पोलिसांनी केले आहे़ तर काही जण त्या दहशतवादी संघटनेत दाखल झाले व काहींना अटक करण्यात आली. युवकांना त्यांनी कधीही कल्पना केली नसतील अशी आमिषे दाखविण्यात आली. अशा युवकांना त्यापासून रोखून माघारी आणण्यासाठी कुटुंबातून, शिक्षकांकडून दबाब असला पाहिजे. पडसलगीकर म्हणाले की, दहशतवादी प्रकरणांची हाताळणी महाराष्ट्र एटीएस (दहशतवादविरोधी पथक) करीत असून मुंबई पोलीस एटीएस आणि संबंधित इतर केंद्रीय यंत्रणांनाही पूर्ण सहकार्य करतील. छोटा राजनचे प्रत्यार्पण, शीना बोरा हत्याकांड अशी अत्यंत महत्वाची प्रकरणे केंद्रीय गुप्तचर खात्याकडे सोपविण्यात आल्यामुळे मुंबई पोलिसांच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे का, असे विचारता ते म्हणाले की, सीबीआय तपास करणारी विशेष अशी यंत्रणा असून अनेक राज्यांतील प्रकरणांचा तपास ती करू शकते. प्रत्येक प्रकरण हे दुसऱ्या प्रकरणापासून वेगळे असते.
अहमद जावेद यांनी मुंबई पोलिसांना दोन टिष्ट्वटरवर सक्रिय केले होते. तोच पुढाकार तुम्ही कायम राखणार का, असे विचारता ते म्हणाले की सोशल मीडिया हे नागरिकांच्या संपर्कात राहण्यासाठी चांगले माध्यम आहे व जावेद यांनी सुरू केलेल्या चांगल्या गोष्टी मी सुरू ठेवीन.
इसिसमध्ये जाण्यापासून काही जणांना रोखण्याचे काम पोलिसांनी केले आहे; काहींना अटक करण्यात आली आहे. दहशतवादी प्रकरणांची हाताळणी महाराष्ट्र एटीएस (दहशतवादविरोधी पथक) करीत असून, मुंबई पोलीस एटीएस आणि संबंधित इतर केंद्रीय यंत्रणांनाही पूर्ण सहकार्य करतील.
- दत्तात्रय पडसलगीकर, पोलीस आयुक्त, मुंबई

Web Title: Pascalgikar accepted Mumbai's axle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.