राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल

By Admin | Published: July 1, 2017 02:51 AM2017-07-01T02:51:37+5:302017-07-01T02:51:37+5:30

राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी भाजपाचे नेते, माजी आमदार पाशा पटेल यांची शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pasha Patel as the Chairman of the State Agricultural Price Commission | राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल

राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल

googlenewsNext

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी भाजपाचे नेते, माजी आमदार पाशा पटेल यांची शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्ती केली. शेतमालाचा उत्पादन खर्च काढणे, त्या संदर्भात केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला शिफारशी करण्याचे काम राज्य आयोग करीत असतो. राज्य शेतमाल समिती आतापर्यंत राज्यात अस्तित्वात होती. आयोगाची स्थापना पहिल्यांदाच करण्यात आली आहे.
शरद जोशी यांच्या नेतृत्वात अनेक वर्षे शेतकरी संघटनेचे
बिनीचे शिलेदार राहिलेले पाशा पटेल हे शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे यासाठी सातत्याने आग्रही
राहिले आहेत. याच मागणीसाठी २०११ मध्ये त्यांनी लातूर ते
नागपूर अशी २४ दिवसांची पदयात्रा काढली होती. ते विधान परिषदेचे माजी सदस्य असून भाजपाच्या
किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.

Web Title: Pasha Patel as the Chairman of the State Agricultural Price Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.