"तेजस"मधील हेडफोन घेऊन प्रवासी पसार, एलईडी स्क्रीन्सही केल्या खराब

By admin | Published: May 25, 2017 02:15 AM2017-05-25T02:15:02+5:302017-05-25T11:22:49+5:30

अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेली मुंबई-करमळी (गोवा) सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस प्रवाशांच्या सोयीची आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसचे पुढील चार-पाच दिवसांचे आरक्षणदेखील फुल्ल आहे.

Passenger expanses, LED screens, and even headphones in "Tejas" | "तेजस"मधील हेडफोन घेऊन प्रवासी पसार, एलईडी स्क्रीन्सही केल्या खराब

"तेजस"मधील हेडफोन घेऊन प्रवासी पसार, एलईडी स्क्रीन्सही केल्या खराब

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेली मुंबई-करमळी (गोवा) सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस प्रवाशांच्या सोयीची आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसचे पुढील चार-पाच दिवसांचे आरक्षणदेखील फुल्ल आहे. परंतु बेशिस्त प्रवाशांमुळे तेजसमध्ये सुविधांचा बोजवारा उडाला. प्रवाशांनी आसनांखाली फेकलेले उष्टे खाद्यपदार्थ तसेच बायो शौचालयांचा केलेला गैरवापर यामुळे तेजसमध्ये अस्वच्छता व दुर्गंधी पसरली.


तेजसमध्ये मोफत वाय-फाय, आरामदायी आसने, प्रत्येक प्रवाशासाठी स्वतंत्र एलईडी स्क्रीन बसवण्यात आले आहेत. मात्र मुंबई ते करमळी हा प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी एलईडी स्क्रीनसह दिलेल्या ‘हेडफोन्स’वर डल्ला मारल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
प्रवाशांनी अनेक आसनांखाली उष्टे खाद्यपदार्थ आणि तत्सम फेकलेल्या वस्तूंमुळे गाडी कमालीची अस्वच्छ झाली होती. संपूर्ण ट्रेन वातानुकूलित असल्यामुळे हा वास अधिकच पसरला.

ट्रेनमधील बायो-शौचालयांचा वापर अयोग्य केल्यामुळे शौचालयांमध्येही दुर्गंधी पसरली. या गाडीमध्ये असलेल्या स्वयंचलित दरवाजामुळे एक प्रवासी रत्नागिरी स्टेशनवर राहून गेल्याचे समोर आले. तथापि, स्वयंचलित दरवाजे हे चोऱ्या आणि अन्य घातपाताच्या प्रकारांना आळा बसण्यासाठी असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: Passenger expanses, LED screens, and even headphones in "Tejas"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.