एसटीची ‘प्रवासी वाढवा’ योजना १७ वर्षांनंतर बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 05:52 AM2018-05-28T05:52:35+5:302018-05-28T05:52:35+5:30

‘परिवर्तनाकडून खासगीकरणाकडे’ प्रवास करणाऱ्या एसटी महामंडळाने आणखी एक पाऊल पुढे टाकले. महामंडळाची अत्यंत यशस्वी ठरलेली ‘प्रवासी वाढवा’ ही योजना यंदा बंद करण्यात आली आहे.

'Passenger Expansion' scheme closed after 17 years! | एसटीची ‘प्रवासी वाढवा’ योजना १७ वर्षांनंतर बंद!

एसटीची ‘प्रवासी वाढवा’ योजना १७ वर्षांनंतर बंद!

Next

- महेश चेमटे
मुंबई - ‘परिवर्तनाकडून खासगीकरणाकडे’ प्रवास करणाऱ्या एसटी महामंडळाने आणखी एक पाऊल पुढे टाकले. महामंडळाची अत्यंत यशस्वी ठरलेली ‘प्रवासी वाढवा’ ही योजना यंदा बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी लाख रुपये बक्षीस असलेल्या या योजनेच्या अहवालाची प्रतीक्षा अद्याप मुख्यालयाला आहे. यामुळे अधिकाºयांच्या अनागोंदी कारभारामुळे या योजनेला तिलांजली देण्यात आली.
परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी प्रवासी वाढवा योजनेचा प्रभाव पाहता, २१ डिसेंबर २०१६ रोजी योजनेच्या बक्षिसात वाढ केली होती. यामुळे प्रवासी योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाºया आगाराला २५ हजारांहून थेट १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्याची घोषणा केली होती. याच बरोबर वाहक आणि चालकाला अनुक्रमे ५ हजार आणि ३ हजार रुपये रोख देण्याचा निर्णयदेखील मंत्री रावते यांनी घेतला होता. मात्र, अधिकाºयांचा मनमानी कारभार आणि अल्प पाठिंबा, यामुळे प्रवासी योजना बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

एसटीचा ‘प्रवासी राजदूत’ वाहक-चालक मानला जातो. एसटीच्या वाहक-चालकांना प्रवासी वाढविण्यासाठी प्रोत्साहन म्हणून रोख पारितोषिक देण्यात येत होते. राज्यातील २५० आगार पातळीवर सर्वाधिक प्रवासी वाहून नेणाºया वाहक आणि चालकास दरमहा रोख रक्कम देऊन गौरविण्यासाठी हे अभियान होते. या अभियानामुळे एसटीपासून दुरावलेला प्रवासी पुन्हा एसटीकडे वळण्यास सुरुवात होईल, असा विश्वास हे अभियान सुरू करताना, महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी व्यक्त केला होता.

कशी होती योजना?
- २००० साली एसटी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी ही योजना सुुरू केली होती. जानेवारी ते मार्च दरम्यान प्रवासी ‘सिझन’ नसल्यामुळे या काळात प्रवासी वाढविण्यासाठी या याजनेचा वापर केला जात होता.
- त्या काळी प्रवासी योजनेंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाºया आगाराला २५ हजार रोख पारितोषिक देत गौरविण्यात येत होते. तीन महिन्यांच्या या योजनेत दरमहा आगाराला अशा प्रकारे गौरविण्यात येत असे. वाहतूक विभागाकडून ही योजना राबविण्यात येत होती.

रकमेत वाढ, मात्र अहवालाचीच प्रतीक्षा
डिसेंबर २०१६ मध्ये ‘१ जानेवारी १७ ते ३१ मार्च १७’ या कालावधीसाठी मंत्री रावते यांनी या योजनेच्या बक्षिसात चौपट वाढ केली. यामुळे पहिल्या क्रमांकाच्या आगाराला १ लाख रोख देण्याची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर, द्वितीय क्रमांकाच्या आगाराला ७५ हजार आणि तृतीय क्रमांकाला ५० हजार रोख देण्याचा निर्णय घेतला, तर उत्कृष्ट सांघिक कामगिरी करणाºया विभागाला ५० हजार रुपयांचे विशेष पारितोषिकही जाहीर करण्यात आले.
मग रावतेंच्या निर्णयाचे काय?
- एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक आर.आर.पाटील यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, जानेवारी ते मार्च या काळात कार्यरत असणारी एसटी महामंडळाची ‘प्रवासी वाढवा’ योजना बंद करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून ही योजना बंद आहे.
- यामुळे या वर्षी ही योजना राबविण्यात आलेली नाही, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक आर.आर.पाटील यांनी सांगितले. यामुळे मंत्री रावते यांच्या ‘प्रवासी योजना-१७’ मध्ये बक्षिसाची रक्कम वाढविण्याचा निर्णय मग कसा घोषित केला? याची चर्चा सध्या महामंडळात रंगत आहे.

Web Title: 'Passenger Expansion' scheme closed after 17 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.