प्रवाशांना सेवा पोलादी एसटीतून

By admin | Published: August 24, 2016 05:50 AM2016-08-24T05:50:02+5:302016-08-24T05:50:02+5:30

एसटी महामंडळाने अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळण्यासाठी व ती कमी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

Passenger service to passenger ST | प्रवाशांना सेवा पोलादी एसटीतून

प्रवाशांना सेवा पोलादी एसटीतून

Next


मुंबई : ‘एसटीचा प्रवास, विना अपघात प्रवास’ असे घोषवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाने अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळण्यासाठी व ती कमी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. जीवितहानी टाळण्यासाठी महामंडळाने बसच्या बांधणीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सर्व बसेसच्या बांधणीसाठी पोलादाचा वापर केला जाईल.
एसटीच्या ताफ्यात जवळपास १८ हजार बसेस असून, त्यांची बांधणी ही अ‍ॅल्युमिनियमने करण्यात आली आहे. या बसेसचे आयुर्मान हे साधारणपणे आठ वर्षांचे असते. एसटी बसचा अपघात झाल्यास अ‍ॅल्युमिनियम बांधणीच्या असलेल्या बसेस जीवितहानी टाळण्यासाठी कमी पडत आहेत. त्यामुळे बस स्टीलने बांधण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. सध्या एका बसमध्ये असा प्रयोग करण्यात आला आणि त्याची कार्यशाळेत चाचणी करण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांनी दिली. त्यामुळे एसटीच्या सुरुवातीला ५00 बसेसची संपूर्ण बाह्य बांधणी ही पोलादाने केली जाईल. या सर्व बसेस अन्य कारखान्यातून बांधून घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी कंत्राट पद्धतीने काम दिले जाईल. त्यावर एसटीच्या तंत्रज्ञांकडूनही लक्ष दिले जाणार आहे. बसच्या आकारातही बदल करतानाच, त्यांची उंची वाढविण्यावरही भर दिला
जात असल्याचे देओल म्हणाले. (प्रतिनिधी)
>राज्यात मोठ्या प्रमाणात एसटी बसचे अपघात होताना दिसतात. २0१२-१३ ते २0१४-१५ सालापर्यंत दर लाख किलोमीटरमागे अपघातांचे प्रमाण हे 0.१५ टक्के एवढे होते. हेच प्रमाण 0.१४ टक्क्यांवर आले आहे. २0१४-१५मध्ये एकूण ४९५ जण अपघातांत दगावले होते. २0१५-१६शी तुलना करता या वर्षात ४0७ जण दगावले असून, ते प्रमाण बरेचसे कमी आहे. सरासरी वर्षाला जवळपास ४८५ जण एसटीच्या अपघातात दगावतात. यामध्ये एसटी प्रवाशांच्या अपघातांचे प्रमाण साधारपणे ६९ आहे.

Web Title: Passenger service to passenger ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.