मेट्रो स्टेशनवर प्रवाशाची आत्महत्या
By admin | Published: September 18, 2016 11:48 AM2016-09-18T11:48:18+5:302016-09-18T11:48:18+5:30
साकीनाका मेट्रो स्थानकावर उदय मिश्रा नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केल्यामुळे मेट्रोसेवा मागील दीड तासापासून विस्कळीत झाली होती.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ : साकीनाका मेट्रो स्थानकावर उदय मिश्रा नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केल्यामुळे मेट्रोसेवा मागील दीड तासापासून विस्कळीत झाली होती. घाटकोपरहून वर्सोव्याकडे जाणाऱ्या मेट्रो मरोळ नाका स्टेशनपर्यंतच चालवल्या जात होत्या. मात्र दीड तासाच्या खोळंब्यानंतर हळूहळू सेवा पूर्वपदावर आली आहे.
सकाळी तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोचा खोळंबा झाल्याचे वृत्त समोर आले होते. वर्सोवाकडे जाणारी मेट्रो मरोळ स्थानकापर्यंतच होती त्यामुळे मेट्रो स्थानकात प्रवाशांची एकचं गर्दी झाली होती. तर घाटकोपर मेट्रो स्टेशनवर प्रवाशी तिकिटाचे पैसे परत करण्याची मागणी केली होती.
सुट्टीचा दिवस असल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी नसली, तरी सुट्टीनिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. एकीकडे मध्य रेल्वेवर महामेगाब्लॉक असतानाच मेट्रोही रखडल्याने प्रवाशांचा संताप व्यक्त होत आहे.
#Alert | Mumbai Metro operations stuck after a suicide at Saki Naka station.
— Times of India (@timesofindia) September 18, 2016