बर्थविना होताहेत प्रवाशांचे हाल

By Admin | Published: June 5, 2016 08:43 PM2016-06-05T20:43:12+5:302016-06-05T20:43:12+5:30

उन्हाळ्यात वेटिंग वाढल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले

Passengers' arrival is not possible without berth | बर्थविना होताहेत प्रवाशांचे हाल

बर्थविना होताहेत प्रवाशांचे हाल

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 5-  उन्हाळ्यात वेटिंग वाढल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. कडक उन्हात बर्थशिवाय अनेक प्रवाशांना प्रवास करण्याची पाळी आली. परंतु जून महिना सुरू झाल्यानंतरही प्रवाशांचे हाल कमी झाले नाहीत. अद्यापही रेल्वेगाड्यातील वेटिंगची स्थिती जैसे थे आहे. २० जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
उन्हाळ्यात अनेक नागरिक बाहेरगावी जाण्याचे प्लॅनिंग करतात. यामुळे या काळात रेल्वेगाड्यातील वेटिंग वाढलेले असते. अनेक गाड्यात तर तिकीटही मिळत नाही म्हणजे रिग्रेटची स्थिती असते. परंतु उन्हाळा संपत आला तरी प्रवाशांचे हाल संपले नसून अद्यापही त्यांच्या हातात वेटिंगचेच तिकीट मिळत आहे. मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यात विदर्भ एक्स्प्रेसमध्ये १५ जूनपर्यंत १०० ते ११५ वेटिंग, दुरांतो एक्स्प्रेसमध्ये १३ जूनपर्यंत ९१ वेटिंग, सेवाग्राम एक्स्प्रेस १२ जूनपर्यंत ६१ वेटिंग आहे.पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यात नागपूर-पुणे एक्स्प्रेस १३ जूनपर्यंत ९५ वेटिंग, गरीबरथमध्ये १७ जूनपर्यंत ४५ वेटिंग आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यात स्वर्णजयंती एक्स्प्रेसमध्ये ३५ वेटिंग, एपी संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये ११ जूनपर्यंत ३० वेटिंग, गोंडवाना एक्स्प्रेसमध्ये १४ जूनपर्यंत २९ वेटिंग, तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये ११ आणि १२ जूनला रिग्रेटची स्थिती असून केरळ एक्स्प्रेसमध्ये ६६ वेटिंग आहे. चेन्नईकडे जाणाऱ्या गाड्यात थिरुक्कुरल एक्स्प्रेसमध्ये १९ जूनपर्यंत वेटिंग, जीटी एक्स्प्रेसमध्ये ११ जूनपर्यंत वेटिंग, तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये १५ जूनपर्यंत वेटिंगची स्थिती आहे. जयपूरकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यात बिलासपूर-भगत की कोठी एक्स्प्रेसमध्ये १५ जूनपर्यंत वेटिंग, पुरी एक्स्प्रेसमध्ये १४ जूनपर्यंत ५० वेटिंग, जयपूर एक्स्प्रेसमध्ये १२ जूनपर्यंत ४३ वेटिंग आहे. साधारणत: नागपुरातून चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये जवळपास २० जूनपर्यंत वेटिंगची स्थिती आहे. त्यानंतरच प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळू शकेल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Passengers' arrival is not possible without berth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.