प्रवाशांचा मेगाताप, डोंबिवलीजवळ लोकलचा डबा घसरल्याने वाहतूक विस्कळीत

By admin | Published: July 19, 2015 12:35 PM2015-07-19T12:35:43+5:302015-07-19T12:35:43+5:30

मध्य रेल्वेचे रडगाणे सुरुच असून रविवारी ठाकूर्ली - डोंबिवली दरम्यान लोकल ट्रेनचा डबा घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Passengers' passenger traffic disrupted due to slow down of local train near Dombivli | प्रवाशांचा मेगाताप, डोंबिवलीजवळ लोकलचा डबा घसरल्याने वाहतूक विस्कळीत

प्रवाशांचा मेगाताप, डोंबिवलीजवळ लोकलचा डबा घसरल्याने वाहतूक विस्कळीत

Next

ऑनलाइन लोकमत

डोंबिवली, दि. १९ -  मध्य रेल्वेचे रडगाणे सुरुच असून रविवारी ठाकूर्ली - डोंबिवली दरम्यान लोकल ट्रेनचा डबा घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रविवारच्या मेगाब्लॉकमध्ये या अपघाताची भर पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागत आहे. 

रविवारी दुपारी ठाकूर्ली - डोंबिवली दरम्यान सीएसटीकडे जाणा-या धीम्या मार्गावर लोकल ट्रेनचा डबा घसरला. यामुळे मुंबईकडे जाणा-या धीम्या मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून सध्या धीम्या मार्गावरील वाहूत जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. 

Web Title: Passengers' passenger traffic disrupted due to slow down of local train near Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.