पेंटाग्राफला आग लागल्याने प्रवाशांनी मारल्या उड्या!
By admin | Published: April 20, 2015 03:21 AM2015-04-20T03:21:50+5:302015-04-20T03:21:50+5:30
लोकलच्या पेंटाग्राफला तांत्रिक बिघाडामुळे आग लागली. त्यामुळे घाबरलेल्या तीन-चार प्रवाशांनी लोकलमधून उड्या मारल्याची घटना रविवारी सकाळी ८.३५ च्या सुमारास कळवा स्थानकादरम्यान
डोंबिवली : लोकलच्या पेंटाग्राफला तांत्रिक बिघाडामुळे आग लागली. त्यामुळे घाबरलेल्या तीन-चार प्रवाशांनी लोकलमधून उड्या मारल्याची घटना रविवारी सकाळी ८.३५ च्या सुमारास कळवा स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर घडली. यामध्ये तीन प्रवासी जखमी झाले असून यात दोन महिलांचा समावेश आहे.
सुप्रिया डुंबरे (रा. दिवा) व हीना पारसनीस (रा. विलेपार्ले) आणि रामदास चव्हाण (दिवा) अशी जखमींची नावे आहेत. घटनेनंतर त्या तिघांवरही इस्पितळात उपचार सुरू असून त्यातील एकाला फ्रॅक्चर असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. दरम्यान इतर प्रवाशांनी संयम ठेवल्याने मोठी दुर्घटना टळली. यामुळे काही काळ रेल्वे सेवा बाधीत झाली होती.
ठाणे स्थानकातून सकाळी तुडुंब भरून धावणाऱ्या लोकलच्या पेंटाग्राफला कळवा स्थानकादरम्यान स्पार्किंग होऊन नंतर आग लागली. या प्रकारामुळे घाबरलेल्या या तिघांनीही लोकलमधून उड्या मारल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार पी.ए. खेतमाळी यांनी दिली.