रविवारी प्रवाशांची उडणार तारांबळ
By Admin | Published: January 9, 2016 03:00 AM2016-01-09T03:00:06+5:302016-01-09T03:00:06+5:30
जर तुमची मुंबईतून सुटणारी ट्रेन रविवारी असेल अथवा तुम्ही रविवारी मुंबईत पोहोचणार असाल तर थोडे थांबा... कारण मुंबईतून सुटणाऱ्या व मुंबईत येणाऱ्या तब्बल ४२ ट्रेनच्या वेळापत्रकात डोक्याला ताप ठरतील
मुंबई : जर तुमची मुंबईतून सुटणारी ट्रेन रविवारी असेल अथवा तुम्ही रविवारी मुंबईत पोहोचणार असाल तर थोडे थांबा... कारण मुंबईतून सुटणाऱ्या व मुंबईत येणाऱ्या तब्बल ४२ ट्रेनच्या वेळापत्रकात डोक्याला ताप ठरतील असे बदल ‘मरे’नेकेले आहेत. यातील मुंबईत येणाऱ्या काही ट्रेन तर नाशिक, पुणे व पनवेलपर्यंतच येणार आहेत; आणि मुंबईतून सुटणाऱ्या काही ट्रेनची स्थितीही अशीच काहीशी प्रवाशांसाठी पायपीट करणारी ठरणार आहे. या ब्लॉकमुळे ठाण्याहून विशेष बस सोडण्यात येणार आहे.
१३६ वर्षे जुना असलेला हँकॉक पूल पाडण्याचे काम ९ जानेवारीच्या मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून घेण्यात येणार आहे. यासाठी १८ तासांचा ब्लॉक घेऊन रविवारी संध्याकाळी ६.२० वाजेपर्यंत हे काम पूर्ण केले जाईल. या कामासाठी रविवारी मुंबई येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या तब्बल ४२ मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे जवळपास ८ कोटींचा रिफंड प्रवाशांना द्यावा लागणार आहे.
मुंबईतून जाणाऱ्या १५ हजार प्रवाशांना याचा फटका बसेल. हा मनस्ताप सहन करावा लागत असतानाच आणखी एका मोठ्या त्रासाला मेल-एक्स्प्रेस ट्रेनच्या प्रवाशांना सामोरे जावे लागेल. ब्लॉकमुळे मुंबईतून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस ट्रेनच्या सुरुवातीच्या तसेच अंतिम स्थानकात बदल करण्यात आला आहे. १० जानेवारी रोजी सीएसटीकडे येणाऱ्या १९ मेल-एक्स्प्रेस ट्रेनला अंतिम थांबे हे ठाणे, पनवेल, दादर, पुणे, कल्याण येथे देतानाच मनमाड आणि नाशिक रोड येथेही देण्यात आले आहेत.
याच दिवशी सीएसटीहून सुटणाऱ्या १३ मेल-एक्स्प्रेसच्या सुरुवातीच्या स्थानकातही बदल करण्यात आले असून, त्या पनवेल, दादर, ठाणे, पुणे, नाशिक येथून सोडण्यात येणार आहेत.
(कंसात अंतिम स्थानक)
अमृतसर एक्स्प्रेस (ठाणे), मेंगलोर एक्स्प्रेस (पनवेल), हैदराबाद हुस्सेनगर एक्स्प्रेस (दादर), मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस (पनवेल), सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस (दादर), गोेंदिया विदर्भ एक्स्प्रेस (ठाणे), छत्रपती शाहू महाराज महालक्ष्मी एक्स्प्रेस (ठाणे), फिरोजपूर पंजाब मेल (ठाणे), नागपूर दुरन्तो एक्स्प्रेस (दादर), नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस (दादर), हैदराबाद एक्स्प्रेस (ठाणे), चेन्नई एक्स्प्रेस (दादर), कन्याकुमारी एक्स्प्रेस (पुणे), हावडा मेल (मनमाड), सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस (कल्याण), हावडा कोलकाता मेल (मनमाड), लखनौ पुष्पक एक्स्प्रेस (नाशिक रोड), हावडा गीतांजली एक्स्प्रेस (ठाणे), नांदेड तपोवन एक्स्प्रेस (नाशिक रोड)
१० जानेवारी : सीएसटीहून सुटणाऱ्या ट्रेन - पुढील स्थानकातून सुटतील
मडगाव मांडवी एक्स्प्रेस (पनवेल), बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस (दादर), हैदराबाद एक्स्प्रेस (दादर), नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस (दादर), नागपूर दुरंन्तो एक्स्प्रेस (दादर), मेंगलोर एक्स्प्रेस (पनवेल), हावडा गीतांजली एक्स्प्रेस (ठाणे), नांदेड तपोवन एक्स्प्रेस (नाशिक), लखनौ पुष्पक एक्स्प्रेस (नाशिक), कन्याकुमारी एक्स्प्रेस (पुणे), हावडा मेल (मनमाड), सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस (कल्याण), हावडा कोलकाता मेल (मनमाड)