दहावी उत्तीर्ण होणे आता झाले सोपे, जानेवारीपासून वर्ग होणार सुरू; मुक्त विद्यालयांतूनही परीक्षा देता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 06:18 AM2019-11-28T06:18:27+5:302019-11-28T06:18:43+5:30

दहावीमध्ये अवघड वाटणाऱ्या विषयांशिवाय यापुढे परीक्षा देता येणार आहे. गणित, विज्ञान, इंग्रजीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहते.

Passing tenth is now easier, classes start from January; Examination can also be done in open schools | दहावी उत्तीर्ण होणे आता झाले सोपे, जानेवारीपासून वर्ग होणार सुरू; मुक्त विद्यालयांतूनही परीक्षा देता येणार

दहावी उत्तीर्ण होणे आता झाले सोपे, जानेवारीपासून वर्ग होणार सुरू; मुक्त विद्यालयांतूनही परीक्षा देता येणार

Next

रत्नागिरी : दहावीमध्ये अवघड वाटणाऱ्या विषयांशिवाय यापुढे परीक्षा देता येणार आहे. गणित, विज्ञान, इंग्रजीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहते. या विद्यार्थ्यांना अवघड वाटणाºया या विषयांशिवाय आता परीक्षा देता येणार आहे. जानेवारी २०२० पासून मुक्त विद्यालयाचे दहावीचे वर्ग सुरु होणार आहेत. आठवी उत्तीर्ण किंवा वयाची पंधरा वर्षे पूर्ण असणाºया कोणत्याही विद्यार्थ्याला दहावीचा प्रवेश मिळणार आहे.

मुक्त विद्यालयाचा अभ्यासक्रम दहावी बोर्डाप्रमाणेच असणार आहे. दोन भाषा विषयांसह कोणतेही तीन अशा एकूण पाच विषयांची निवड विद्यार्थ्यांना करता येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या एकूण २१ व राष्टÑीय कौशल्य विकास अभ्यासक्रमातील एकूण १४ विषयांमधून हे विषय निवडता येणार आहेत. नोंदणी केल्यानंतर पाच वर्षापर्यंत परीक्षा देण्याची सवलत विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सोयीनुसार कोणत्याही एका विषयाची परीक्षा देता येणार आहे.

असं असेल मुक्त विद्यालय
मुक्त विद्यापीठाप्रमाणेच मुक्त विद्यालयाची केंद्र नियुक्त केली जातील. या केंद्रात प्रवेश घेणाऱ्यांना शाळेत जाण्याची आवश्यकता नाही. या केंद्रांवर त्या मुलांना त्यांनी निवडलेल्या विषयानुसार शिकवण्या दिल्या जातील. ही केंद्रे सरकारमान्य असल्यामुळे तेथून दहावी उत्तीर्ण होणाºयांनाही नियमित शाळेच्या प्रमाणपत्राच्या दर्जासारखेच प्रमाणपत्र मिळेल.

Web Title: Passing tenth is now easier, classes start from January; Examination can also be done in open schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.