पतंजलीचे २.८४ लाख हडपल्याचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 04:16 AM2017-12-04T04:16:54+5:302017-12-04T04:17:08+5:30

मालाच्या विक्रीतून मिळालेला आणि अन्य कामासाठी मालकाने दिलेला पैसा हडप करणाºया वागळे इस्टेटमधील पतंजलीच्या व्यवस्थापकाविरुद्ध पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.

Patanjali filed a complaint of 2.84 lakh strikes | पतंजलीचे २.८४ लाख हडपल्याचा गुन्हा दाखल

पतंजलीचे २.८४ लाख हडपल्याचा गुन्हा दाखल

Next

ठाणे : मालाच्या विक्रीतून मिळालेला आणि अन्य कामासाठी मालकाने दिलेला पैसा हडप करणाºया वागळे इस्टेटमधील पतंजलीच्या व्यवस्थापकाविरुद्ध पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.
वागळे इस्टेटमधील लुईसवाडीमध्ये पतंजली प्रॉडक्टच्या वितरकाचे कार्यालय आहे. उल्हासनगर येथील संतोषकुमार मिश्रा येथे व्यवस्थापक म्हणून काम पाहतो. पतंजलीच्या वेगवेगळ्या उत्पादनांच्या विक्रीतून येणारा पैसा त्याच्याकडे जमा होतो. नियमाप्रमाणे त्याने ती रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा करणे अपेक्षित होते. मात्र, आॅगस्ट २०१३ ते डिसेंबर २०१५ या काळात त्याने उत्पादनाच्या विक्रीतून येणाºया पैशांवर डल्ला मारला. अशा प्रकारे एक लाख ८९ हजार ७९३ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप या कंपनीचे मालक मुलुंडचे गोवर्धन विठ्ठल प्रभू यांनी केला
आहे.
याशिवाय, कर्मचाºयांच्या पगारासाठी प्रभू यांनी त्याला काही रक्कम दिली होती. त्यापैकी ९५ हजार रुपयेही संतोषकुमारने हडपल्याचा आरोप आहे. असा एकूण दोन लाख ८४ हजार ७९३ रुपयांचा गैरव्यवहार त्याने केल्याचा संशय असून, प्रभू यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Patanjali filed a complaint of 2.84 lakh strikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा