‘पतंजली’ला किरकोळ भावात भूखंड का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2017 03:53 AM2017-05-06T03:53:03+5:302017-05-06T03:53:03+5:30

नागपूर येथील ६ हजार एकर भूखंड योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदिकला खरोखरच किरकोळ भावात देण्यात आला का

Patanjali is a retail property? | ‘पतंजली’ला किरकोळ भावात भूखंड का?

‘पतंजली’ला किरकोळ भावात भूखंड का?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नागपूर येथील ६ हजार एकर भूखंड योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदिकला खरोखरच किरकोळ भावात देण्यात आला का? हे जर सत्य असेल तर कोणत्या आधारावर ही ‘सवलत’ देण्यात आली? अशी विचारणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारकडे केली.
रामदेव बाबांच्या कंपनीच्या ‘फूड पार्क’साठी नागपूरच्या विमानतळाजवळ जागा देण्यासाठी नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे. या याचिकेवर सहा आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
‘कंपनीला किरकोळ भावात जागा का दिली, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. किरकोळ भावात भूखंड दिला असेल, तर ही ‘सवलत’ कोणत्या आधारावर दिली, हेही आम्हाला माहीत करून घ्यायचे आहे,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले.
‘पतंजली’ला राज्य सरकारने अनुकूलता दाखवत किरकोळ भावात कोट्यवधी रुपयांचा भूखंड दिला. यामुळे प्रत्येक एकरपाठी सरकारला १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. रामदेव बाबांच्या कंपनीसाठी सरकारने त्यांच्याकडून प्रत्येक एकरसाठी २५ लाख रुपये आकारले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी विनंती याचिकेत केली आहे.

Web Title: Patanjali is a retail property?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.