पटेलांनी चुका शोधून मान्य करण्याचा मोठेपणा दाखवावा - माणिकराव ठाकरे
By admin | Published: September 24, 2016 09:26 PM2016-09-24T21:26:25+5:302016-09-24T21:26:25+5:30
पटेलांनी सत्ता असताना झालेल्या चुका शोधून तो मान्य करण्याचा मोठेपणा दाखवावा असं माणिकराव ठाकरे बोलले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 24 - राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसमध्ये राज्यातील सत्ता गेली, असा आरोप केला होता. पटेल यांचे वक्तव्य हे ‘नेतृत्वाचे’ वक्तव्य नाही, असा टोला हाणत पटेलांनी सत्ता असताना झालेल्या चुका शोधून तो मान्य करण्याचा मोठेपणा दाखवावा, असा सल्ला ज्येष्ठ काँग्रेस नेते व विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी अकोल्यात दिला. स्थानिक प्रमिलाताई ओक हॉलमध्ये आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी, माजी मंत्री रामदास बोडखे, सुधाकर गणगणे, प्रा. अझहर हुसेन, माजी आ. नतिकोद्दीन खतीब, लक्ष्मणराव तायडे, प्रदेश सचिव वजाहत मिर्जा व अमरावती विभागीय पदवीधर संघाचे उमेदवार संजय खोडके आदी उपस्थित होते. माणिकराव ठाकरे म्हणाले, की आघाडीची सत्ता असताना घेतलेला निर्णय हा केवळ एका पक्षाचा नसतो, आघाडी करताना काही धोरणे ठरतात त्यानुसार निर्णय होतात, त्यामुळे आरोप करणे चुकीचे आहे. आघाडीच्या लोकांनी विचारपूर्वक बोलले पाहिजे. पटेलांनी मात्र तसे केले नाही. त्यांनी आरोप करण्यापेक्षा सत्ता गमावण्यामध्ये कोणत्या चुका झाल्या, त्या शोधून त्या मान्य करण्याचा मोठेपणा दाखवावा, असा सल्ला त्यांनी दिला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची सध्या आघाडी नाही, त्यामुळे प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. येणाºया निवडणुकांमध्ये स्थानिक संदर्भ पाहून समविचारी पक्षासोबत कार्यकर्त्यांनी बसावे व समविचारी पक्षाबाबत विचारपूर्वक बोलावे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.