पटेल आंदोलनाने दिल्लीचे राजकारण तापले, गुजरातेत तणावपूर्ण शांतता

By admin | Published: August 28, 2015 03:08 AM2015-08-28T03:08:38+5:302015-08-28T03:08:38+5:30

हार्दिक पटेल यांच्या आंदोलनाने गुजरातमध्ये भडकलेल्या हिंसाचारानंतर दिल्लीचे राजकारण चांगलेच तापले असून बिगर भाजप पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला लक्ष्य

Patel stirred up Delhi's politics, stressed calm in Gujrat | पटेल आंदोलनाने दिल्लीचे राजकारण तापले, गुजरातेत तणावपूर्ण शांतता

पटेल आंदोलनाने दिल्लीचे राजकारण तापले, गुजरातेत तणावपूर्ण शांतता

Next

- शीलेश शर्मा,  नवी दिल्ली
हार्दिक पटेल यांच्या आंदोलनाने गुजरातमध्ये भडकलेल्या हिंसाचारानंतर दिल्लीचे राजकारण चांगलेच तापले असून बिगर भाजप पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला लक्ष्य केले आहे. आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले नसल्याचे मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल म्हणत असतील तर गोळीबाराचे आदेश कुणी दिले, असा प्रश्न मोदींच्या राजकीय विरोधकांनी उचलून धरला असून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोदींना धारेवर धरले आहे.
गुुरुवारी राहुल गांधी जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर पोहोचले. यावेळी श्रीनगरपासून २५ किमी अंतरावरील पंपोर शहरानजीकच्या एका गावात शेतकऱ्यांच्या रॅलीला संबोधित करताना पटेल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदींना जोरदार लक्ष्य केले. पंतप्रधान द्वेषाचे राजकारण करीत आहेत. सध्या गुजरातमध्ये त्याचेच परिणाम दिसत आहेत, असे राहुल यावेळी म्हणाले. काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी यानिमित्ताने गुजरात सरकार आणि मोदींना लक्ष्य करीत प्रश्नांचा भडिमार केला. गुजरात मॉडेलचे वास्तव काय? लोकांनी निवडून दिलेले सरकार आपल्या लोकांवर असे अत्याचार करणार का? गोळीबार-लाठीमाराने समस्येवर तोडगा निघणार का? गोळीबाराचे आदेश आनंदीबेन यांनी दिले नसतील तर ते कुणी दिले? असे सवाल सुरजेवाला यांनी केले.
काँग्रेसने पटेल आंदोलनास खुला पाठिंबा देणे टाळले असले तरी या मुद्यावर मोदी व मोदी सरकारला धारेवर धरण्याचे काँग्रेसचे मनसुबे यामुळे उघड झाले आहेत. काँग्रेससह डावे पक्ष, आम आदमी पार्टी, जदयू यासारखे पक्षांनीही पटेल आंदोलनावरून मोदी सरकारला घेरण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
गुजरात मॉडेलवर प्रश्नचिन्ह!
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पटेल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक विकासाचे ‘गुजरात मॉडेल’ इतकेच यशस्वी आहे तर मग या विकासात वाटा मागणाऱ्या इतक्या आंदोलनकर्त्यांचा मृत्यू का झाला, असे खोचक टिष्ट्वट ओमर यांनी गुरुवारी केले. माकपाचे महासचिव सीताराम येचुरी यांनीही ‘गुजरात मॉडेल’वर तोंडसुख घेतले.


हार्दिक यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या शांततेच्या आवाहनास न जुमानता पटेल समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी गुरुवारी आरक्षण आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.आरक्षणाच्या मागणीच्या समर्थनार्थ पटेल समाजाच्या शेतकऱ्यांनी शहरात भाज्या आणि दूधासारख्या आवश्यक वस्तूंचा पुरवठा बंद करावा, असे आवाहन त्यांनी केले.

अनेक शहरांत लष्कर तैनात
अहमदाबाद : पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनास हिंसक वळण लागल्यानंतर गुरुवारी गुजरातेत तणावपूर्ण शांतता आहे. आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दहावर पोहोचली असून स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अहमदाबाद, सूरत, मेहसाणा अशा अनेक शहरांत लष्कर तैनात करण्यात आले आहे.

विधानसभेत गोंधळ
गांधीनगर : गुजरातेतील पटेल आरक्षण आंदोलन आणि हिंसाचाराच्या मुद्यांवर गुरुवारी काँग्रेस आमदारांनी राज्य विधानसभेत जोरदार गोंधळ घातला. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज अनेकदा स्थगित करण्यात आले.

विधानसभेत गोंधळ
गांधीनगर : गुजरातेतील पटेल आरक्षण आंदोलन आणि हिंसाचाराच्या मुद्यांवर गुरुवारी काँग्रेस आमदारांनी राज्य विधानसभेत जोरदार गोंधळ घातला. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज अनेकदा स्थगित करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी कमीत कमी आठ ठिकाणचे रेल्वे रुळ उखडून फेकल्याने रेल्वेसेवा प्रभावित झाली आहे. यामुळे १२ रेल्वेगाड्या पूर्णत: तर १९ रेल्वेगाड्या आंशिक रूपात रद्द करण्यात आल्या आहेत.

जाटही छेडणार आंदोलन
गुजरातेतील पटेल समाजाने आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच हरियाणातील जाट समुदायानेही आरक्षणासाठी दंड थोपटण्याची तयारी चालवली आहे. येत्या महिन्यापासून हरियाणातील जाट समुदायही ओबीसी कोट्याअंतर्गत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू करणार आहे.

 

Web Title: Patel stirred up Delhi's politics, stressed calm in Gujrat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.