पाथर्डी हत्याकांडातील आरोपींना फाशी नको!

By admin | Published: December 4, 2014 02:41 AM2014-12-04T02:41:04+5:302014-12-04T02:41:04+5:30

पाथर्डी हत्याकांड प्रकरणातील आॅनलाइन याचिकेतील आरोपींची फाशीची शिक्षा अयोग्य असून, फाशीऐवजी दुर्मीळ घटनेत कठोरात कठोर शिक्षा सुनावण्यात यावी

Pathardi death row convicts should not be hanged! | पाथर्डी हत्याकांडातील आरोपींना फाशी नको!

पाथर्डी हत्याकांडातील आरोपींना फाशी नको!

Next

मुंबई : पाथर्डी हत्याकांड प्रकरणातील आॅनलाइन याचिकेतील आरोपींची फाशीची शिक्षा अयोग्य असून, फाशीऐवजी दुर्मीळ घटनेत कठोरात कठोर शिक्षा सुनावण्यात यावी, असे मत ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात साधू यांनी मराठी अभ्यास केंद्राशी पत्रव्यवहार केला आहे.
डॉ. साधू यांच्या म्हणण्यानुसार, राज्यपालांकडे आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी करणे म्हणजे न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप केल्यासारखे होईल. तर डॉ. कुमार अनिल यांच्या मते, जवखेडचे
प्रकरण हे अतिशय घृणास्पद
प्रकरण आहे; तरीही फाशी ही फॅसिस्ट मागणी आहे.
या याचिकेला पाठिंबा देणे किंवा न देणे एवढाच पर्याय या याचिकेत असल्यामुळे आणि केवळ फाशीची मागणी केल्यामुळे जवखेडच्या प्रकरणात सर्वस्तरीय समाजाचा पाठिंबा मिळण्यास अडसर होत असेल तर त्या मागणीचाही पुनर्विचार व्हायला हवा, असे साधू यांनी सुचविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pathardi death row convicts should not be hanged!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.