भंडाऱ्यात आढळला डेल्टा प्लस व्हेरियंटचा एक रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 07:08 PM2021-08-24T19:08:25+5:302021-08-24T19:09:59+5:30
कोरोनाचा नवा व्हेरियंट म्हणून गणला जाणाऱ्या डेल्टा प्लस विषाणूचा एक रुग्ण भंडारा जिल्ह्यात आढळून आला.
भंडारा : कोरोनाचा नवा व्हेरियंट म्हणून गणला जाणाऱ्या डेल्टा प्लस विषाणूचा एक रुग्ण भंडारा जिल्ह्यात आढळून आला असून त्याच्या स्त्रावाचे नमुने जून महिन्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दरम्यान हा रुग्ण बरा झाला असून त्याच्या संपर्कातील कोणालाही डेल्टा प्लसची लक्षण नाहीत.
कोरोनाचा पुढील विषाणू म्हणून डेल्टा प्लस आहे. सध्या राज्यात या विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. भंडारा जिल्ह्यात एक रुग्ण आढळून आला. जून महिन्यात भंडारा तालुक्यातील एका रुग्णाच्या स्त्रावाचे नमुन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन महिन्यानंतर सोमवारी त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्या तो डेल्टा प्लस व्हेरियंटचा रुग्ण असल्याचे पुढे आले. मात्र दरम्यानच्या काळात तो ठणठणीत झाला. आरोग्य विभागाने त्याच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली. कोणालाही डेल्टा प्लसची लक्षणे आढळून आली नाही. डेल्टा प्लसचे जिल्ह्यात आगमन झाले असून नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.