रुग्ण सुखाय...
By admin | Published: August 29, 2015 02:09 AM2015-08-29T02:09:48+5:302015-08-29T02:09:48+5:30
सरकारी हॉस्पिटलमधून कायम जाणवणारी घाण, अस्वच्छता आणि कमालीचा नकारार्थी सूर बदलून दाखवत जे. जे. हॉस्पिटलच्या रेडिओलॉजी विभागाने गेल्या दोन वर्षांत केलेली क्रांती केवळ
- अतुल कुलकर्णी, मुंबई
सरकारी हॉस्पिटलमधून कायम जाणवणारी घाण, अस्वच्छता आणि कमालीचा नकारार्थी सूर बदलून दाखवत जे. जे. हॉस्पिटलच्या रेडिओलॉजी विभागाने गेल्या दोन वर्षांत केलेली क्रांती केवळ डोळे दिपवून टाकणारी आहे असे नाही, तर लाखो रुग्णांच्या आयुष्यात या विभागाने नव्याने जगण्याची आशादेखील निर्माण केली आहे. राज्यातले सगळ्यात अत्याधुनिक थ्री टेसला एमआरआय हे मशिन केवळ जे़जे़मध्ये आहे, याची कोणतीही फुशारकी न करता या विभागाने वर्षभरातच १० हजार रुग्णांच्या तपासण्या पूर्ण केल्या आहेत.
जे.जे.मध्ये आधुनिकीकरणाचे वारे आणले अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी. रेडिओलॉजी विभागात आता एखाद्या पंचतारांकित खाजगी हॉस्पिटलमध्ये गेल्याची सुखद जाणीव पावलोपावली होते. शिवाय कोणत्याही सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये नाही अशी पॅक्स सिस्टीम येथे कार्यान्वित केली गेली, ज्यामुळे एमआरआय, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि एक्सरे या सर्व तपासण्यांचे रिपोर्ट कोणत्याही डॉक्टरांना त्यांच्या कॉम्प्युटरवर केवळ रुग्ण क्रमांकावरून पाहून निदान करता येते. त्यासाठी रुग्णांना भल्या मोठ्या रिपोर्टची फाइल आणि भेंडोळी घेऊन फिरत बसावे लागत नाही. विशेष म्हणजे हे सगळे रिपोर्ट्स एक वर्षे रेडिओलॉजी विभागातल्या संगणकांवर आणि त्यानंतरची पाच वर्षे हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीमवर सांभाळून ठेवले जातात. रुग्णाला फक्त आपला नंबर सहा वर्षे लक्षात ठेवावा लागतो. व्हेरिकोज व्हेन लेजर थेरपी (रक्तवाहिनीचा आजार) देखील येथे होऊ लागली आहे. ज्यासाठी बाहेर किमान लाखभर रुपये मोजावे लागत होते अशी ही थेरपी येथे फक्त २५ हजारांच्या आत होत आहे. खऱ्या अर्थाने जे़जे़च्या रेडिओलॉजी विभागाने टाकलेली कात लाखो रुग्णांना दिलासा देणारी ठरली
आहे. डॉ. लहाने यांच्यासह या
विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी गजभिये तसेच डॉ. शिल्पा दोमकोंडवार यांनी यासाठी केलेले काम सरकारी डॉक्टरांच्या तथाकथित प्रतिमेला
बदलून टाकणारे ठरले
आहे.
‘जेजे’त रेडिओलॉजीत
एका वर्षात
होणाऱ्या तपासण्या
प्रकारसंख्या
एक्सरे १,८०,०००
सोनोग्राफी१,००,०००
एमआरआय १५,०००
सीटी स्कॅन ५५,०००
दरातला मोठा फरक (रुपये)
प्रकार‘जेजे’मध्येखाजगी
(किमान)
एमआरआय२,००० ते २,५०० १०,०००
सीटी स्कॅन१५५ ते २,००० १५,०००
एक्स रे७५ २५०
सोनोग्राफी१०० १५००
व्हेरिकोज
व्हेन थेरपी२५,०००८०,०००
मेंदूतल्या रक्तवाहिन्यांमधील ब्लॉक काढण्यापासून ते मेंदूतल्या वेड्यावाकड्या झालेल्या रक्तवाहिन्या नीट करण्यापर्यंतचे उपचार येथे होताहेत, ज्याचा फायदा राज्यभरातील रुग्णांना होत आहे. सगळ्या तपासण्या नाममात्र दरात करून देत आहोत. -डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता
कॉम्प्युटरच्या एका बटणावर रुग्णांचे सगळे रिपोर्ट्स आम्ही विभागात कोठेही बसून तपासू शकतो. यासाठी गेली दोन-तीन वर्षे सतत केलेली मेहनत फळाला आली.
-डॉ. शिल्पा दोमकोंडवार, सहा. प्रोफेसर