गणपतीच्या मार्गात खड्डय़ांचे विघ्न

By admin | Published: August 5, 2014 12:58 AM2014-08-05T00:58:33+5:302014-08-05T00:58:33+5:30

गणरायाच्या आगमनाला तीन आठवडे उरले असल्याने सार्वजनिक मंडळांची लगबग सुरू झाली आह़े

Pavement obstruction on the path of Ganpati | गणपतीच्या मार्गात खड्डय़ांचे विघ्न

गणपतीच्या मार्गात खड्डय़ांचे विघ्न

Next
शेफाली परब-पंडित - मुंबई 
गणरायाच्या आगमनाला तीन आठवडे उरले असल्याने सार्वजनिक मंडळांची लगबग सुरू झाली आह़े मात्र, खड्डय़ांसाठी पालिका प्रशासन मंडळांनाच जबाबदार धरत असल्याने बृहन्मुंबई सार्वजनिक गणोशोत्सव समन्वय समितीने गणोशमूर्ती आगमन व विसजर्नाच्या प्रमुख रस्त्यांची पाहणी करून तीन हजार खड्डय़ांची यादी तयार केली आह़े छायाचित्रंसह ही यादी लवकरच प्रशासनाला सादर करण्यात येणार आह़े
दरवर्षी पावसाळ्यात मुंबई खड्डय़ांत जात असल्याने गणोशमूर्ती सावधगिरीने आणण्याचे सार्वजनिक मंडळांपुढे मोठे आव्हान असत़े मात्र, मंडप बांधण्यासाठी खोदलेल्या खड्डय़ांमुळेच ही समस्या निर्माण होत असल्याचा अजब जावईशोध प्रशासनाने लावला आह़े मंडपांमुळे मुंबईत हजारो खड्डे पडल्याचा दावा प्रशासनाने गेल्या बैठकीत केला़ यामुळे संतप्त सार्वजनिक मंडळांनी गेल्या 15 दिवसांत मुंबईतील प्रमुख रस्त्यांची पाहणी करून खड्डय़ांची यादीच तयार केली आह़े 
लालबागचा राजा, गणोशगल्ली, अशा मुंबईतील मोठय़ा गणपतींच्या आगमन व विसजर्नाच्या मार्गातच हे खड्डे असल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितल़े महापौरांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आयोजित बैठकीत ही यादी सादर करण्यात येणार आह़े कार्यकत्र्यानी छायाचित्रंसह तयार केलेली ही यादी या बैठकीत दाखवण्यात येईल, असे समितीचे सचिव गिरीश वालावलकर यांनी सांगितल़े  
 
खाजगी कंपन्यांवर कारवाई काय?
सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांच्या मंडप व जाहिराती लावल्यामुळे मुंबईत गतवर्षी 4क् हजार खड्डे पडल्याचे प्रशासनाने गेल्या बैठकीत मंडळांना बजावल़े मात्र, जाहिराती मंडपाच्या गेटवर लावण्यात येतात़ याउलट, खाजगी कंपन्यांच्या खोदकामांमुळे पडलेल्या खड्डय़ांकडे सलग दोन वर्षे लक्ष वेधूनही प्रशासन काही करीत नसल्याचा संताप दहिबावकर यांनी व्यक्त केला़
 
हे प्रमुख रस्ते खड्डय़ांत
समन्वय समितीने तयार केलेल्या यादीमध्ये पेडर रोड, गुरू गोविंद सिंग रोड मुलुंड, आणि शंकराचार्य क्रॉस रोड पवई, लालबहादूर शास्त्री मार्ग भांडुप, कांजूरमार्ग, नाहूर व्हिलेज रोड, मुलुंड पश्चिम, सायन-पनवेल हाय वे, वांद्रे रेल्वे स्थानक रोड, एस़व्ही़ रोड, दौलतनगर सांताक्रूझ, दुसरी सुतार गल्ली, अप्पासाहेब पेंडसे मार्ग गिरगाव, सी़पी़ टँक चौक, दोन टाकी अशा महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्डे असल्याचा समन्वय समितीचा दावा आह़े
 
ग्रॅण्ट रोड, सांताक्रूझ, वांद्रे, अंधेरी, कुर्ला, घाटकोपर, मालाड, गोरेगाव, बोरिवली, भांडुप या विभागांमधून सर्वाधिक खड्डय़ांची नोंद पालिकेच्या संकेतस्थळावर झाली आह़े 

 

Web Title: Pavement obstruction on the path of Ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.