LMOTY 2022: ‘मिशन २८’ यशस्वी करणाऱ्या पवनीत कौर ठरल्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या मानकरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 08:47 PM2022-10-11T20:47:12+5:302022-10-11T21:11:54+5:30

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022 : सन २०२२ च्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’च्या प्रोमिसिंग आय ए एस अधिकारी म्हणून पवनीत कौर (Pavneet Kaur)  या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. 

Pavneet Kaur won theLokmat Maharashtrian of the Year Awards 2022, Lokmat Awards, Eknath shinde, Devendra Fadnavis, Nana Patekar, Ranveer Singh, Kiara Advani | LMOTY 2022: ‘मिशन २८’ यशस्वी करणाऱ्या पवनीत कौर ठरल्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या मानकरी 

LMOTY 2022: ‘मिशन २८’ यशस्वी करणाऱ्या पवनीत कौर ठरल्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या मानकरी 

googlenewsNext

मुंबई: लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती. आय ए एस (प्रोमिसिंग) या श्रेणीत सात जणांना नामांकन मिळालं होते. सन २०२२ च्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’च्या प्रोमिसिंग आय ए एस अधिकारी म्हणून पवनीत कौर (Pavneet Kaur)  या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यामध्ये लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसह सेलिब्रिटींनी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.

मेळघाट हा दुर्गम भाग, येथे माता व नवजात बालकांचे मृत्यू कमी होत नाहीत, अशी सततची ओरड आहे. त्यासाठी मिशन २८ हा अभिनव उपक्रम राबविला गेला आणि त्यामुळे नवजात मृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाली. त्याला कारण ठरल्या अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर. गरोदर, स्तनदा व हाय रिस्क असलेल्या मातांकडे २८ दिवस प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीनंतर आशा वर्कर्स व आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या मदतीने ५६ दिवस विशेष लक्ष देण्याची योजना आखली गेली. 

दोन दिवसांतून एकदा त्यांच्या घरी भेट, वजन घेणे, निरीक्षण आणि तपासणी सुरू केली. जानेवारी २०२२ पासून झालेल्या मिशन २८ मुळे घरगुती प्रसूतीचे प्रमाण, तसेच नवजातांचे मृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण कमी होऊन सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागला. वंचित तरुणींनाही स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे व यासाठी तिला आकांक्षा प्रकल्पाने पाठबळ दिले गेले. अमरावती जिल्ह्यातील ६,४०५ तरुणींची या प्रकल्पासाठी नोंदणी झालेली आहे. 

या सर्व तरुणींना उपजीविका प्रदान करणे, सोबतच सक्षम करणे, हा आकांक्षा प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे. संपूर्ण विदर्भात कौर यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. स्वत:च्या विशेषाधिकारात १८ महिन्यांचा निवासी सॉफ्टवेअर प्रशिक्षण कार्यक्रम व १०० टक्के नोकरीची हमी, हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. हा प्रकल्प सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होत आहे. वंचित युवतींना प्रत्यक्ष रोजगार देऊन डिजिटल इंडिया मिशन आणि महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट यामुळे आकाराला येणार आहे.

Read in English

Web Title: Pavneet Kaur won theLokmat Maharashtrian of the Year Awards 2022, Lokmat Awards, Eknath shinde, Devendra Fadnavis, Nana Patekar, Ranveer Singh, Kiara Advani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.