‘जैतापूर’साठी पवार सरसावले

By admin | Published: April 12, 2015 01:47 AM2015-04-12T01:47:11+5:302015-04-12T01:47:11+5:30

सत्तेत राहून प्रकल्पाला विरोध करणे योग्य नाही, असा टोला त्यांनी नाशिक येथे माध्यमांशी बोलाताना शिवसेनेला लगावला.

Pawar asked for 'Jaitapur' | ‘जैतापूर’साठी पवार सरसावले

‘जैतापूर’साठी पवार सरसावले

Next

मुंबई : कोकणातील जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोई होलांद यांनी एका महत्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर आता या प्रकल्पासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील पुढे सरसावले आहेत. हा प्रकल्प देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण आहे, असे सांगतानाच सत्तेत राहून प्रकल्पाला विरोध करणे योग्य नाही, असा टोला त्यांनी नाशिक येथे माध्यमांशी बोलाताना शिवसेनेला लगावला.
दरम्यान, अमरावती येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेच्या प्रकल्पविरोधी भूमिकेवर टीका केली. पंतप्रधानांनी देशाच्या हिताचाच करार फ्रान्सशी घडवून आणला आहे. त्यामुळे कुणीही त्याला विरोध करण्याचे कारण नाही, असा टोला लगावला. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची चांगलीच गोची झाल्याचे दिसत आहे.
केंद्रात काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुढाकार घेऊन अणुऊर्जेसंबंधी महत्वपूर्ण करार केले. संपूर्ण जगाचे लक्ष या कराराकडे लक्ष लागले होते. तेव्हापासून शिवसेना या प्रकल्पाला विरोध आहे. मात्र, आता पंतप्रधान मोदी यांनी करारावर स्वाक्षरी केल्याने शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाला असता
जैतापूर प्रकल्पावर शिवसेनेचे आम्ही मन वळवू, असे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. खडसेंच्या या वक्तव्यानंतर सुभाष देसाई, एकनाथ शिंदे हे सेनेचे मंत्री उठून गेले. मंत्री रामदास कदम आणि खा. संजय राऊत सोडले तर शिवसेनेतील इतर नेते जैतापूरबाबत उघडपणे बोलताना दिसत नाहीत. (विशेष प्रतिनिधी)

च्हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा असल्याने आमची सरकारला सहकार्याचीच भूमिका राहील. उलट जे सरकारमध्ये सामील आहेत त्यांचा विरोध अनठायी आहे. एकीकडे राज्यात आणि केंद्रात सत्तेत राहायचे आणि दुसरीकडे सरकारलाच विरोध करायचा, ही गोष्ट चुकीची असल्याचे सांगत सेनेने आधी सत्तेतून बाहेर पडावे मग विरोध करावा, असे पवार यांनी सांगितले.

च्तारापूर अणूऊर्जा प्रकल्पातून राज्याला स्वस्त व पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता वीज मिळते आहे. त्यामुळे राज्याचा विकास होतो आहे. जर अशीच वीज जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पातून उपलब्ध होणार असेल तर त्याला आपल्या पक्षाचा पाठिंबाच असेल.

Web Title: Pawar asked for 'Jaitapur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.