पवारच कर्णधार

By admin | Published: June 18, 2015 02:56 AM2015-06-18T02:56:41+5:302015-06-18T02:56:41+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि प्रतिष्ठेचे बनलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत अखेर शरद पवार यांनीच बाजी मारली.

Pawar captain | पवारच कर्णधार

पवारच कर्णधार

Next

रोहित नाईक , मुंबई
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि प्रतिष्ठेचे बनलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत अखेर शरद पवार यांनीच बाजी मारली. १७६ मतांसह विजयी होत पवार सातव्यांदा अध्यक्षपदी विराजमान झाले. पवारांनी क्रिकेट फर्स्ट पॅनलचे उमेदवार डॉ. विजय पाटील यांचा ३४ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत पवार - म्हाडदळकर गटाने १७ पैकी १५ जागांवर विजय मिळवून एमसीएचे मैदानही जिंकले.
एमसीएच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी एकूण ३२९ पैकी ३२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शिवसेनेची साथ मिळाल्याने विजय पाटील यांच्या रूपाने पवारांना एमसीएमध्ये २००१ नंतर प्रथमच तगडे आव्हान मिळाले होते. मात्र हे आव्हान मोडून काढत पवारांनी ‘कर्णधारपद’ कायम राखले. पाटील यांना १४२ मते मिळाली.
उपाध्यक्षपदावर देखील पवार - म्हाडदळकर गटाचे दोन्ही उमेदवार माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर (१९५) आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (१८३) यांनी बाजी मारली. त्यांच्यासमोर आव्हान उभे केलेल्या क्रिकेट फर्स्ट गटाचे प्रताप सरनाईक (१२४) व माजी क्रिकेटपटू अ‍ॅबी कुरविल्ला (१२२) यांचा मोठा पराभव झाला. खजिनदारपदावर पवार - म्हाडदळकर गटाचे नितीन दलाल यांनी १८९ मते मिळवताना क्रिकेट फर्स्ट गटाच्या मयांक खांडवाला (१२९) यांचे आव्हान परतवले.
त्याचवेळी सह-सचिवपदी पवार - म्हाडदळकर गटाच्या पी. व्ही. शेट्टी (१८५) यांच्यासह क्रिकेट फर्स्टच्या डॉ. उन्मेश खानविलकर (१५९) यांनी बाजी मारली. खानविलकर यांच्या रूपाने क्रिकेट फर्स्ट गटाने पदाधिकारी पदावर एकमेव जागा जिंकली. त्याचवेळी या पदासाठी उभे असलेले अनुभवी रवी सावंत (१४०) यांच्या रुपाने पवार - म्हाडदळकर गटाचा एकमेव पराभव झाला.
तर क्रिकेट फस्टर्चे माजी
क्रिकेट्पटू लालचंद राजपूत (१२९) यांना देखील पराभव पत्करावा लागला.
कायर्कारीणी सदस्यपदाच्या ११ पैकी १० जागांवर पवार - म्हाडदळकर गटाने बाजी मारली. यामध्ये अरमान मलिक (२०५), विनोद देशपांडे (१९०), नविन शेट्टी (१८५), अरविंद कदम (१८३), पंकज ठाकूर (१८३), दीपक पाटील (१७९), श्रीकांत तिगडी (१६९), आलम शाह (१६५), रमेश वाजगे (१६३) आणि गणेश अय्यर (१६१) यांचा समावेश आहे. क्रिकेट फर्स्टकडून माजी क्रिकेट्पटू प्रवीण आमरे (१७०) एकमेव उमेदवार निवडून आले. तर पवार - म्हाडदळकर गटाचे केवळ दीपक मूरकर (१४९) यांचा पराभव झाला.
शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी-भाजपा असा सामना निवडणुकीत पाहता आला. निवडणुकीमध्ये चार जण तांत्रिक कारणांमुळे मतदान करू शकले नाहीत. दोन जणांनी आजारी असल्याचे कारण देऊन मतदान केले नाही.

क्रिकेटसाठी आम्ही एकत्र आलो
सर्व विजयी उमेदवारांचे मी अभिनंदन करतो. मुंबई क्रिकेटच्या भवितव्यासाठी आम्ही एकत्र आलो आणि एकत्र काम करणार. आतापर्यंत मुंबई क्रिकेट असोसिएशनध्ये महिलांना स्थान नव्हते. मात्र महिला प्रतिनिधींचा समावेश करण्यासाठी आम्ही घटनेत बदल करू. त्यासाठी विशेष एजीएम (वार्षिक सर्वसाधारण सभा) बोलवू. मुंबई महिला क्रिकेट संघाला आणखी सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करू. - शरद पवार

गड आला पण सिंह गेला....
एमसीएच्या पदादिकाऱ्यांच्या निवडणुकीत पवार - म्हाडदळकर गटाने वर्चस्व राखले असले तरी रवी सावंत यांच्या पराभवाने सर्व निराश झाले. यावर विजयी अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, सावंत यांचा पराभव म्हणजे गड आला पण सिंह गेला असेच म्हणावे लागेल. ते जरी हरले असले तरी त्यांच्या अनुभवाचा आम्ही फायदा करून घेणार आहोत.

हा क्रिकेटचाच विजय आहे. ज्यांनी या निवडणुकीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला त्यांचा पराभव झाला. आम्ही क्रिकेटसाठी एकत्र आलो आणि क्रिकेटलाच प्राधान्य देणार असल्याने आम्हाला यश आले. - आशिष शेलार

मुंबईकरांसाठी काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. या संधीचे मी सोने करेन. मुंबई क्रिकेटला जुने दिवस पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन.
- दिलीप वेंगसरकर

अध्यक्ष
शरद पवार

ुउपाध्यक्ष
दिलीप वेंगसरकर
आशिष शेलार

खजिनदार
नितीन दलाल
संयुक्त सचिव
डॉ. पी.व्ही. शेट्टी
डॉ. उन्मेश खानविलकर

कार्यकारिणी सदस्य
अरमान मलिक
विनोद देशपांडे
नवीन शेट्टी
अरविंद कदम
पंकज ठाकूर
दीपक पाटील
प्रवीण आमरे
श्रीकांत तिगडी
आलम शाह
रमेश वाजगे
गणेश अय्यर

Web Title: Pawar captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.