पवार करणार असहिष्णुतेवर मंथन
By Admin | Published: February 5, 2016 03:52 AM2016-02-05T03:52:10+5:302016-02-05T03:52:10+5:30
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून देशातील धार्मिक वातावरण बिघडल्याचे, असहिष्णुता वाढल्याची ओरड होत आहे
मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून देशातील धार्मिक वातावरण बिघडल्याचे, असहिष्णुता वाढल्याची ओरड होत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी देशातील प्रमुख विचारवंत, इतिहासकारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत असहिष्णुतेवर मंथन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शुक्रवारी सकाळी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी राज्यातील आणि देशातील प्रमुख इतिहासकार, विचारवंतांना बोलावण्यात आले आहे.
या बैठकीत असहिष्णुतेबाबत शरद पवार इतिहासकारांची मते जाणून घेणार असून, देशातील सद्य:स्थितीवर या वेळी विस्ताराने चर्चा होण्याची शक्यता आहे. बिहार निवडणुकीपूर्वी देशात असहिष्णुतेवर मोठा वाद निर्माण झाला होता. त्या वेळी देशातील वाढत्या असहिष्णुतेचा निषेध म्हणून अनेक साहित्यिक, विचारवंतांनी आपले पुरस्कार परत केले होते.