पवार काका-पुतण्याने केला 25 हजार कोटींचा घोटाळा - अण्णा हजारे
By admin | Published: January 4, 2017 10:30 AM2017-01-04T10:30:28+5:302017-01-04T12:05:59+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता बारामतीतील पवार कुटुंबियांविरोधात असहकार पुकारत सहकारी कारखान्यांसदर्भात याचिका दाखल केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 4 - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता बारामतीतील पवार कुटुंबियांविरोधात असहकार पुकारत सहकारी कारखान्यांसदर्भात याचिका दाखल केली आहे. यात दोन जनहित याचिका तर एक फौजदारी याचिकेचा समावेश आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चौकशी मागणीदेखील केली आहे.
घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी, शिवाय यासाठी विशेष तपास पथक नेमण्यात यावे, अशीही मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे. सहकारी कारखान्यांच्या खासगीकरणावर आक्षेप नोंदवत अण्णा हजारेंनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सहकारी साखर कारखान्यांमधील या घोटाळ्यात शरद पवार, अजित पवार यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोपही हजारे यांनी याचिकेत केला आहे.