पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 06:22 AM2024-05-11T06:22:17+5:302024-05-11T06:23:11+5:30
बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले मनाने आणि हृदयाचेही नाते होते. मात्र त्यांचाच सुपुत्र जेव्हा चारा घोटाळा करणारे आणि बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांसोबत जाऊन मोदींना जिवंत गाडण्याची भाषा करतात तेव्हा दु:ख होते.
- रमाकांत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी आत्मसन्मान गमावून काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा त्यांनी सन्मानाने अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन व्हावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथील जाहीर सभेत दिला.
बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले मनाने आणि हृदयाचेही नाते होते. मात्र त्यांचाच सुपुत्र जेव्हा चारा घोटाळा करणारे आणि बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांसोबत जाऊन मोदींना जिवंत गाडण्याची भाषा करतात तेव्हा दु:ख होते. बारामती निवडणुकीनंतर चिंतित शरद पवार यांनी निराश होऊन छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची भाषा केल्याचे माेदी म्हणाले.
सन्मानाने इकडे या...
शरद पवार यांची नकली राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे यांची नकली शिवसेना ४ जूननंतर काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे. त्यांनी आत्मसन्मान गमावून काँग्रेससोबत जाण्यापेक्षा सन्मानाने अजित पवार व एकनाथ शिंदेंसोबत येऊन काम करावे, असा सल्ला मोदी यांनी दिला.