मुख्यमंत्र्यांमुळे पवार ‘वेटींग’वर

By admin | Published: January 10, 2016 03:44 AM2016-01-10T03:44:22+5:302016-01-10T03:44:22+5:30

डॉ.आप्पासाहेब पवार पुरस्कार वितरण सोहळ्याला पोहोचण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तब्बल दीड तास विलंब झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रतीक्षा करावी लागली.

Pawar, on 'Waiting' due to Chief Minister | मुख्यमंत्र्यांमुळे पवार ‘वेटींग’वर

मुख्यमंत्र्यांमुळे पवार ‘वेटींग’वर

Next

दीड तास विलंब : मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी

जळगाव : डॉ.आप्पासाहेब पवार पुरस्कार वितरण सोहळ्याला पोहोचण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तब्बल दीड तास विलंब झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रतीक्षा करावी लागली. मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातीला शरद पवार आणि उपस्थितांची दिलगिरी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यात आधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाचे उद्घाटन, नंतर महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन हे कार्यक्रम आटोपून दुपारी १.४५ वाजता जैन हिल्स येथील पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार होते. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील उस्मानिया पार्क येथील कार्यक्रम आटोपून जैन हिल्स येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. त्यानुसार पवार हे दुपारी १२ वाजता जैन हिल्स येथे पोहोचले. तेथील गुरूकुल हॉलमध्ये राष्ट्रवादीच्या आजीमाजी आमदार व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळा व मेळाव्यास उपस्थित राहिले. तो मेळावा आटोपून ते पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास्थळी १.४५ वाजता आले. व्यासपीठाच्या मागील बाजूस असलेल्या खोलीत ते थांबले. त्यांच्यासमवेत जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन, कविवर्य ना.धों. महानोर उपस्थित होते. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांना आणखी अर्धा तास विलंब होणार असल्याची घोषणा सूत्रसंचालकांनी केली. आणि कार्यक्रमादरम्यान दाखविण्यात येणार असलेल्या चित्रफिती आता दाखविण्यात येत असल्याचे सूत्रसंचालकाने सांगितले. ते ऐकून शरद पवार हे जैन व महानोर यांच्यासह व्यासपीठावर आले. मी चित्रफिती पाहण्यासाठी व्यासपीठावर आलो हे आवर्जून सूत्रसंचालक डॉ.के.बी.पाटील यांना सांगितले. त्यांनी चित्रफिती बघीतल्या. मुख्यमंत्री जैन हिल्सच्या कार्यक्रमाला ३ वाजून २० मिनिटांनी पोहोचले. (प्रतिनिधी)

उशीर झाल्याबद्दल दिलगिरी... 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उशीर झाल्याबद्दल आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तसेच उपस्थितांकडे दिलगिरी व्यक्त केली. जळगावात येण्यास उशीर झाला. त्यातच महाआरोग्य शिबिराची भव्यता पाहून त्यात हरवून गेलो. मात्र त्यामुळे जैन हिल्सचा कार्यक्रम सुरू होऊ नये याची खबरदारीही आरोग्य शिबिराचे आयोजक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली होती. कारण या कार्यक्रमासाठीच्या निवेदिका मंगला खाडिलकर यांनाच शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमालाही बोलविले होते, असे सांगताच हशा पसरला.

Web Title: Pawar, on 'Waiting' due to Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.