राज्याच्या पाण्यासाठी पवारांना साकडे , गुजरात निवडणुकीपूर्वी अंतिम करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 04:32 AM2017-10-02T04:32:22+5:302017-10-02T04:32:52+5:30

केंद्र सरकारने दमणगंगा - पिंजाळ आणि नार-पार लिंक या दोन्ही प्रकल्पांमधील राज्याचे हक्काचे पाणी गुजरातला वळविण्यासाठी पूर्णत: जोर लावला

Pawar's decision to water the state, final agreement before the elections in Gujarat | राज्याच्या पाण्यासाठी पवारांना साकडे , गुजरात निवडणुकीपूर्वी अंतिम करार

राज्याच्या पाण्यासाठी पवारांना साकडे , गुजरात निवडणुकीपूर्वी अंतिम करार

Next

नाशिक : केंद्र सरकारने दमणगंगा - पिंजाळ आणि नार-पार लिंक या दोन्ही प्रकल्पांमधील राज्याचे हक्काचे पाणी गुजरातला वळविण्यासाठी पूर्णत: जोर लावला असल्याचे सांगत जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासमोर रविवारी हे सर्व प्रात्यक्षिकासह मांडून त्याकडे लक्ष घालण्याचे साकडे घातले़
विशेष म्हणजे गुजरात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाणी वाटपाचा अंतिम करार करण्याचा आग्रह केंद्राने धरला आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये बैठक झाली आहे़ अंतिम करार झाल्यास महाराष्ट्राला आपल्या हक्कावर ‘पाणी’ सोडावे लागेल, अशी भूमिका जाधव यांनी घेतली.
सोमवारच्या शेतकरी अभियानाच्या समारोपासाठी पवार हे रविवारी नाशिकमध्ये आले. जाधव यांनी त्यांची भेट घेऊन महाराष्ट्र व गुजरात पाणी प्रश्नाबाबत आराखड्यासह सविस्तर सादरीकरण केले़ दमणगंगा-पिंजाळ लिंक या प्रकल्पातील एकूण ८३ टीएमसी पाण्यापैकी २० टीएमसी पाणी मुंबईला तर उरलेले ६३ टीएमसी पाणी गुजरातला जाणार आहे़तर नार-पार लिंकमधील ८४ टीएमसी पाण्यापैकी केवळ १० टीएमसी पाण्यावर महाराष्ट्राने आपला अधिकार असल्याचे सांगितले आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तापी खोºयातून मराठवाड्याला पाणी दिले जाणार असल्याचे सांगत असले तरी याबाबतचा कोणताही प्रक ल्प अहवाल महाराष्ट्राने तयार केलेला नाही, असे जाधव यांनी सांगितले.
तापी खोºयातून नवसारी येथे पाणी नेण्याबाबतचा प्रकल्प अहवाल गुजरात राज्याने युद्धपातळीवर तयार करून घेतला आहे़ अंतिम करारावर महाराष्ट्राने स्वाक्षरी केल्यास ५४ टीएमसी पाण्यावर कायमस्वरूपी हक्क सोडावा लागेल, अशी भूमिका पवार यांच्यासमोर जाधव यांनी मांडली़

दमणगंगा - पिंजाळ आणि नार-पार लिंक प्रकल्पाच्या सादरीकरणानंतर पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला़ या प्रश्नाबाबत सोमवारी यशवंतराव चव्हाण सेंटरवर बैठक होत आहे. यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जलसंपदा विभागाच्या सचिवांसमोर आराखड्याचे सादरीकरण होईल. नितीन गडकरी यांची भेट घेऊन राज्याच्या हक्काचे पाणी वाचविण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन पवार यांनी दिल्याचे जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी सांगितले.

Web Title: Pawar's decision to water the state, final agreement before the elections in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.