पवारांचे गलिच्छ ब्राह्मणविरोधी राजकारण - राज ठाकरे यांची घणाघाती टीका
By admin | Published: August 18, 2015 01:17 PM2015-08-18T13:17:21+5:302015-08-18T13:17:21+5:30
ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्यापासून शरद पवारांचा पोटशूळ वाढला असून बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्ताने ते गलिच्छ राजकारण करत असल्याची टीका मनसेप्रमुख राज ठाकरे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्यापासून शरद पवारांचा पोटशूळ वाढला असून बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराच्या निमित्ताने ते गलिच्छ राजकारण करत असल्याची टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. शरद पवारांच्या हस्ते यापूर्वी अनेकवेळा बाबासाहेबांचा सत्कार झाला आहे, त्यावेळी त्यांना माहीत नव्हते का की बाबासाहेबांनी शिवाजीमहाराजांचा अपमान केलाय? की त्यांनी पुरस्कार दिल्यानंतर शिवचरीत्र वाचायला घेतले? असा सवाल करत राज ठाकरे यांनी शरद पवार ब्राह्मणद्वेष्टे राजकारण करत असल्याचा आरोप करत हे राज्याच्या हिताचे नसल्याचे सांगितले. बाबासाहेब पुरंदरेंना हात लावून बघा मी संपूर्ण महाराष्ट्रात तांडव करीन असा इशाराही त्यांनी पुरंदरेविरोधी गटाला दिला आहे.
राष्ट्रवादीमधल्या मराठा लॉबीसह भारतीय जनता पार्टीमधले काही मंत्रीही बाबासाहेबांना पुरस्कार देण्यास आतून विरोध करत असून हे कुभांड रचण्यात आल्याचे ठाकरे म्हणाले.
भालचंद्र नेमाड्यांचाही खरपूस समाचार घेताना त्यांना ५० वर्षांनी कुठे जाग आल्याचा उल्लेख करतानाच नेमाड्यांना हा पुरस्कार हवा होता का? असा प्रश्न विचारत त्यांच्या हेतूबद्दलच शंका उत्पन्न केली.
जितेंद्र आव्हाडसारख्या माणसाची शरद पवारांचा पाठिंबा असल्यामुळेच असं काहीतरी बोलण्याची हिंमत होते असेही ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे पुढीलप्रमाणे:
- परदेशी लेखकांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या लिखाणाचा अभ्यास करूनच बाबासाहेब पुरंद-यांनी पुस्तक लिहीले आहे.
- बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत असलेले लोक त्यांच्या बाजून ठामपणे का उभे रहात नाहीत.
- पुरस्कारांपेक्षा बाबासाहेब खूप मोठे आहेत. ते स्वत: हा पुरस्कार मागायला गेले नव्हते.
- ज्ञानपीठ' पुरस्कार मिळाल्यावर कसं वागावं याचे धडे नेमाडेंनी कुसुमाग्रजांकडून घ्यायला हवे होते.
- नेमाडे यांना ज्ञानपीठ देण्यावरूनही वाद झाला होता मग का स्वीकारला तो पुरस्कार नेमाड्यांनी?
- या सर्व वादामागे भाजपाचे काही मंत्रीही आहेत.
- इतिहासाबाबत आक्षेप असेल तर तो विषय चर्चेने सोडवायचा होता. शरद पवारांनी फूस लावल्यामुळेच जितेंद्र आव्हाड यांची बाबासाहेबांविरोधात बोलण्याची हिंमत होते.
- २०१३ साली पवारांनी बाबासाहेबांचा सत्कार का केला? हे सर्व विद्वान आधी कुठे होते ?
- जर तुम्हाला बाबासाहेबांची मतं पटत नव्हती तर पुस्तकं लिहून खोडून काढा त्यांना, इतकी वर्षे विरोधक काय झोपले होते का?
- ब्राह्मण मुख्यमंत्री झाला हे अजून पचनी पडत नसल्यामुळे शरद पवार गलिच्छ राजकारण करत आहेत.