सरकार जावे, ही पवारांची इच्छा!

By admin | Published: February 15, 2017 04:00 AM2017-02-15T04:00:47+5:302017-02-15T04:02:42+5:30

महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपमध्ये वितुष्ट निर्माण येईल. कदाचित मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे लागेल, असे भाष्य मी दीड वर्षापूर्वी केले होते. पण...

Pawar's wish, should the government go! | सरकार जावे, ही पवारांची इच्छा!

सरकार जावे, ही पवारांची इच्छा!

Next

मुंबई : महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपमध्ये वितुष्ट निर्माण येईल. कदाचित मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे लागेल, असे भाष्य मी दीड वर्षापूर्वी केले होते. पण आता सरकार गेलेच पाहिजे. शिवसेना बाहेर पडली तरी आम्ही हे सरकार वाचविणार नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त वृत्तवाहिन्यांशी बोलताना पवार म्हणाले, विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी फडणवीसांकडे संख्याबळ नव्हते. त्यावेळी आम्ही भाजपला पाठिंबा देऊ, असे मी स्टेटमेंट केले होते. मात्र, ते या दोघांमध्ये (शिवसेना-भाजप) सामंजस्य होऊ नये म्हणूनच. पण अडीच वर्षात ्नराज्याच्या लौकिकाला धक्का बसला आहे. गुंतवणुकीचे वातावरण राहिलेले नाही. झारखंडमध्ये लोक गुंतवणूक करतात, पण महाराष्ट्रात नाही. फडणवीस थापा मारत आहेत. त्यामुळे हे सरकार पडणार असेल, तर राष्ट्रवादी ते वाचविणार नाही.
फडणवीसांपेक्षा जास्त कटुता दिल्लीतील भाजप नेत्यांना शिवसेनेबद्दल आहे. अडवाणी, वाजपेयी समंजस नेते होते. अडवाणी बाळासाहेबांना भेटायला गेल्याचं अनेकवेळा पाहिलं. मात्र आताची जी लिडरशीप आहे, त्यांचं शिवसेनेबद्दल टोकाचं मत आहे, असे निरीक्षणही पवार यांनी नोंदविले. (विशेष प्रतिनिधी)
फडणवीसांनी संस्कृती सोडली
फडणवीस हे सभ्य, सुसंस्कृत गृहस्थ आहेत, असा माझा समज होता, पण त्यांनी अपेक्षाभंग केला आहे. यशवंतरावांनी राज्यात एक संस्कृती रुजविली. फडणवीसांनी त्याला छेद दिला. मुख्यमंत्र्यांनी सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक असते. सामंजस्यासाठी काही गोष्टी गिळायच्या असतात, पण इथे मुख्यमंत्री स्वत:च आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत, असे शरद पवार म्हणाले.

Web Title: Pawar's wish, should the government go!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.