चुकीच्या आकारणीतील वीज बिल रक्कम परत देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:18 AM2017-08-03T01:18:24+5:302017-08-03T01:18:28+5:30
कोल्हापूर जिल्ह्यासह अन्यत्र शेतकºयांकडून चुकीने जादा वीज बिले पाठविण्यात आली असतील तर अशा सर्वांना वीज बिलातील फरकाची रक्कम परत केली जाईल
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यासह अन्यत्र शेतकºयांकडून चुकीने जादा वीज बिले पाठविण्यात आली असतील तर अशा सर्वांना वीज बिलातील फरकाची रक्कम परत केली जाईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिले.
शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांनी नियम २९३ अन्वये प्रस्तावावरील चर्चेत या विषयाकडे लक्ष वेधले होते. २०१२पासून कृषी पंपांची अशी चुकीची बिले महावितरणकडून देण्यात आली. कनेक्शन कापले जाण्याच्या भीतीने शेतकºयांनी या बिलांची रक्कम अदादेखील केली.
मात्र, जादाची रक्कम शेतकºयांना परत देणार का? असा सवाल नरके यांनी केला. या प्रकरणी पडताळणी करण्यासाठी महावितरणने तीन सदस्यीय समिती नेमलेली आहे. त्यात जादा आकारणी झालेल्या शेतकºयांना रक्कम परत केली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.