एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू नाही - दिवाकर रावते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:47 PM2018-03-22T23:47:18+5:302018-03-22T23:47:18+5:30
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी हे राज्य शासनाचे कर्मचारी नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांना सातवा आयोग लागू होत नाही, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत सांगितले.
मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी हे राज्य शासनाचे कर्मचारी नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांना सातवा आयोग लागू होत नाही, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत सांगितले.
सद्यस्थितीत वेतन सुधारणेचा मुद्दा औद्योगिक न्यायाधिकारींकडे प्रलंबित आहे.कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करणे शक्य नसले तरी मान्यताप्राप्त संघटनांसोबत महामंडळाद्वारे वाटाघाटी सुरु आहेत, असे रावते यांनी सांगितले.
सुरक्षारक्षकांना मानधन
पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यांसाठी सुरक्षारक्षक, पर्यवेक्षक नेमले असून त्यांना देय असलेल्या मानधनाची थकित रक्कम एप्रिलमध्ये देण्यात येईल, असे आश्वासन मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी दिले.