शेतकऱ्यांना श्रद्धांजली काय वाहता, परिवर्तन घडवा!

By Admin | Published: October 26, 2015 02:48 AM2015-10-26T02:48:33+5:302015-10-26T02:48:33+5:30

उत्पादन खर्चाच्या तुलनेत न मिळणारा भाव, नैसर्गिक आपत्ती अशा समस्यांच्या गर्तेत कापूस उत्पादक अडकला आहे. त्यातून आत्महत्या होतात

Pay tribute to farmers, transform them! | शेतकऱ्यांना श्रद्धांजली काय वाहता, परिवर्तन घडवा!

शेतकऱ्यांना श्रद्धांजली काय वाहता, परिवर्तन घडवा!

googlenewsNext

जळगाव : उत्पादन खर्चाच्या तुलनेत न मिळणारा भाव, नैसर्गिक आपत्ती अशा समस्यांच्या गर्तेत कापूस उत्पादक अडकला आहे. त्यातून आत्महत्या होतात. आपण श्रद्धांजली वाहण्याची जबाबदारी पार पडतो. पण ही श्रद्धांजली वाहण्याऐवजी कापूस क्षेत्रातील सर्व उद्योजक, शास्त्रज्ञ यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी विश्वसनीय, ठोस काम करायला हवे. मूल्यवर्धनावर भर द्यायला हवा, असे आवाहन मुंबई येथील कोटक ग्रुपचे सर्वेसर्वा तथा जागतिक कापूस बाजारपेठेचे अभ्यासक सुरेश कोटक यांनी केले.
जैन हिल्सवरील गांधी तीर्थवरील सभागृहात रविवारी महाकॉट संमेलन झाले. कपाशीच्या तंत्रज्ञानाबाबत आपण मागे असल्याने उत्पादकताही कमी आहे. थ्री जीएम (जेनेटीकली मॉडीफाईड) तंत्र अजून नाही. देशाची कापूस उत्पादकता ३०० ते ४०० किलो रुई प्रतिहेक्टरवर अडकली आहे. चीनने यंदा १,५०० किलो रुई प्रतिहेक्टरी उत्पादकता गाठण्याचे ठरविले आहे. त्याचा विचार देशातील शास्त्रज्ञ, शासन व इतर संस्थांनी करावा. आपल्याकडे कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते; पण उत्पादन येत नाही. दुसरीकडे इतर देशांमध्ये लागवड कमी क्षेत्रावर होते, पण उत्पादनात ते भारताला मागे टाकण्याची स्पर्धा करतात, असेही कोटक म्हणाले.
गुजरातने शंकर हा रुईचा ब्रॅण्ड विकसित केला आहे. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आफ्रिकेतील देशांच्या तुलनेत भारतातील रुई स्वस्त केली आहे. ब्रॅण्डींग करताना आपल्या रुईचे दर आपल्या मागे असलेल्या देशांमधील रुईच्या तुलनेत अधिक हवेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Pay tribute to farmers, transform them!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.