‘पीसीपीएनडीटी’च्या दक्षता विभागाने फोडले गोठीचे बिंग!

By Admin | Published: March 3, 2017 12:27 AM2017-03-03T00:27:54+5:302017-03-03T00:27:54+5:30

गोपनीय माहितीवरुन पीसीपीएनडीटीच्या अकोला येथील दक्षता विभागाने २३ फेब्रुवारीला सापळा रचला असता, डॉ. सरला गोठी (डी.एच.एम.एस.) यांना सोनोग्राफी करताना रंगेहात पकडण्यात आले.

PCPNDT vigilance department blasted bogie! | ‘पीसीपीएनडीटी’च्या दक्षता विभागाने फोडले गोठीचे बिंग!

‘पीसीपीएनडीटी’च्या दक्षता विभागाने फोडले गोठीचे बिंग!

googlenewsNext

नांदुरा : शहरातील डॉ.राजेंद्र गोठी सोनोग्राफी केंद्र येथे अनधिकृत सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात होतात, अशा गोपनीय माहितीवरुन पीसीपीएनडीटीच्या अकोला येथील दक्षता विभागाने २३ फेब्रुवारीला सापळा रचला असता, डॉ. सरला गोठी (डी.एच.एम.एस.) यांना सोनोग्राफी करताना रंगेहात पकडण्यात आले. यावरून तपासणीस आलेल्या पथकाने सोनोग्राफी मशीन सील केली.
मात्र, एवढा मोठा गैरप्रकार शहराच्या हृदयस्थानी असलेल्या चौकात सुरू असताना अकोला विभागाने कारवाई केल्याने स्थानिक अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी व लेक वाचवा अभियानाचा गवगवा करणारे समाजसेवी झोपले होते काय? किंबहुना त्यांची मूकसंमती या प्रकाराला होती काय? असा प्रश्न जनमानसात आता चर्चिल्या जात आहे.
जिल्ह्यातील स्थानिक अधिकारी व आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना प्रत्येक रुग्णालयातील चालणाऱ्या गैरकारभाराची माहिती असतेच मात्र, आपल्या कर्तव्यानुसार प्रामाणिकपणे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची कमी किंवा स्वत:चे हात शेकून घेण्याची वृत्ती वाढीस लागल्याने नांदुरा शहरातील सोनोग्राफी सेंटरमध्ये पात्रता नसताना सोनोग्राफी करणाऱ्यांना अकोला येथील पीसीपीएनडीटी पथकाला धाव घेऊन सापळा रचून कारवाई करावी लागली. यामुळे जिल्ह्यातील स्थानिक अधिकारी काय करीत होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पीसीपीएनडीटी विभागाने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये एका गर्भवती महिलेला सोनोग्राफीसाठी डॉ.राजेंद्र गोठी यांच्या सोनोग्राफी सेंटरमध्ये पाठविले असता त्यांच्या पत्नी डॉ. सरला गोठी यांनी शैक्षणिक पात्रता व कोणताही परवाना नसताना सदर महिलेची सोनोग्राफी केली. तसेच या सोनोग्राफी केंद्रातून मागील दोन दिवसांपासून आॅनलाइन एम फॉर्म व आॅफलाइन एम फार्म भरले जात नसल्याचे संबंधित पथकाच्या निदर्शनास आले. तसेच वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
लायन्स ज्ञानगंगा ह्या शहरातील सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून डॉ.राजेंद्र गोठी समाजसेवेत कार्यरत आहेत. त्यांच्या हॉस्पिटलमधील या धडक कारवाईमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
याचप्रमाणे इतर सर्व सोनोग्राफी सेंटरची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे.
----------
‘लेक वाचवा’च्या जिल्ह्यातील गैरप्रकार!
बुलडाणा जिल्ह्यातील ‘लेक वाचवा’ या अभियानाचे सर्वत्र कौतुक झाले. याच जिल्ह्यात पतीचे सोनोग्राफी सेंटर शैक्षणिक पात्रता व परवाना नसलेल्या पत्नीकडून चालविल्या जात असल्याचे तसेच येथे अनधिकृत सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात होतात, अशी दक्षता पथकाला मिळालेली गोपनीय माहिती हे ‘लेक वाचवा’ चा गजर देणाऱ्या जिल्ह्यात शोभनीय नाही. शाळा-महाविद्यालयातील चिमुकले ‘लेक वाचवा’चा नारा देत असताना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का? असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे.
----------
सोनोग्राफी केंद्रात कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य कृत्य केले जात नाही. या केंद्राला शासनमान्यता असून, आपण मोठ्या षड्यंत्राचा शिकार बनलो आहोत. सत्य लवकरच बाहेर येईल.
- डॉ. राजेंद्र गोठी,
संचालक, डॉ. गोठी सोनोग्राफी केंद्र, नांदुरा.

Web Title: PCPNDT vigilance department blasted bogie!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.