पीक कर्ज वाटपात पश्‍चिम विदर्भ माघारला

By admin | Published: September 5, 2014 01:28 AM2014-09-05T01:28:24+5:302014-09-05T01:46:38+5:30

लक्षांकाच्या तुलनेत ८७ टक्केच कर्ज वाटप

The peak debt distribution of West Vidarbha is pending | पीक कर्ज वाटपात पश्‍चिम विदर्भ माघारला

पीक कर्ज वाटपात पश्‍चिम विदर्भ माघारला

Next

अकोला : अनियमीत पावसामुळे शेतकर्‍यांना खरीप पीक कर्जाची निंतात गरज असली तरी, राष्ट्रीयकृत बँकांच्या जाचक अटींमुळे पश्‍चिम विदर्भाला पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट अद्याप गाठता आले नाही. असे असले तरी, मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पुढाकाराने पीक कर्जाचा हा आकडा यंदा तीन हजार पाचशे २९ कोटी ७३ लाख ४२ हजारापर्यंत पोहोचला आहे.
पश्‍चिम विदर्भातील जवळपास ५ लाख २१ हजार ८६२ शेतकर्‍यांनी यंदा पीक कर्ज घेतले आहे. हे सर्व कर्ज पश्‍चिम विदर्भातील अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी उपलब्ध करू न दिले आहे. बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या डबघाईस आलेली असल्याने, या जिल्हयातील शेतकर्‍यांना पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांवरच अवलंबून राहावे लागले. त्यामुळे या जिल्हय़ातील २ लाख ३७ हजार ८0१ शेतकर्‍यांना २८ ऑगस्टपर्यंत १४८१ कोटी ९५ लाख ४२ हजाराचे कर्ज वाटप झाले आहे. हे कर्जवाटप एकूण उद्दीष्टाच्या ८७ टक्के असून, उद्दीष्टपूर्तीसाठी आणखी १३ टक्के कर्ज वाटप होणे आवश्यक आहे.
पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांना राष्ट्रीयकृत बँकांनी ३१ जूलैपर्यंत २८६ कोटी १६ लाखाचे खरीप पीक कर्ज वाटप केले आहे. विदर्भ - कोंकण ग्रामीण बॅकांचा यामध्ये ७६ कोटी ९५ लाखाचा वाटा असून, व्यावसायिक अर्थात व्यापारी बँकांनी यामध्ये ७ टक्के कर्ज वाटप केले आहे. त्यांच्या कर्जवाटपाचा आकडा हा ६९ कोटी ८७ लाखापर्यंतचा आहे.
पीक कर्ज वाटपाची मुदत यंदा येत्या ३0 सप्टेंबरपर्यंत असल्याने पश्‍चिम विदर्भाला देण्यात आलेले पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण होईल, अशी अ पेक्षा विभागीय सहनिंबधक संगिता डोंगरे यांनी व्यक्त केली.

** अकोला जिल्हा मध्यवर्तीचे लक्षांक
अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेने यंदा खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. यंदा ३७२ कोटी ११ लाख ३0 हजाराचे उद्दीष्ट होते. या बँकेने यंदा ३५६ कोटी २५ लाख म्हणजचे १0४.४५ टक्के पीक कर्जवाटप केले आहे. हे कर्ज ६६ हजार २५७ शेतकर्‍यांनी घेतले आहे.

** कर्ज वाटप स्थिरावले ८५ टक्क्यांवर !
गतवर्षी जवळपास ९५ टक्क्यांपेक्षा जास्त खरीप पीक कर्जवाटपाचे उद्दीष्ट पूर्ण झाले होते. यंदा मात्र पीक कर्जाचा हा आकडा ८५ टक्क्यांच्या जवळपास स्थिरावला आहे. हे उद्दीष्ट पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकानी लवचिक भूमिका घेणे गरजेचे आहे.

Web Title: The peak debt distribution of West Vidarbha is pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.