उमेदवाराच्या घोषणेत शेकापची आघाडी

By admin | Published: October 17, 2016 02:48 AM2016-10-17T02:48:51+5:302016-10-17T02:48:51+5:30

डिसेंबरमध्ये होवू घातलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांमधून होणार आहे.

The peak's lead in the declaration of the candidate | उमेदवाराच्या घोषणेत शेकापची आघाडी

उमेदवाराच्या घोषणेत शेकापची आघाडी

Next

जयंत धुळप,

अलिबाग- डिसेंबरमध्ये होवू घातलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांमधून होणार आहे. या निवडणुकीकरिता शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून अलिबागचे विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक हेच राहणार असल्याची घोषणा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.
रविवारी येथील कच्छीभवन सभागृहात अलिबाग शहर शेकापच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी आमदार जयंत पाटील बोलत होते. यावेळी अलिबागचे विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, अलिबाग पं.स. उपसभापती अनिल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप जिल्हा कार्यकारिणी सदस्य नृपाल पाटील, अलिबाग तालुका शेकाप चिटणीस अनिल पाटील, शेकाप पुरोगामी युवा संघटना अध्यक्ष अ‍ॅड.संजय पाटील, अलिबाग मुस्लीम समाज प्रतिनिधी नुर सय्यद, शेकाप कार्यालयीन चिटणीस अनंतराव देशमुख, अलिबाग व्यापारी संघटना प्रतिनिधी मुकेश जैन, राजू जैन आदी उपस्थित होते.
अलिबाग नगरपरिषदेतील तीस वर्षांच्या शेकाप सत्ताकाळातील परिवर्तनाच्या प्रक्रियेचा आढावा यावेळी जयंत पाटील यांनी घेतला. प्रथम प्रशांत नाईक यांच्या मातोश्री सुनीता नाईक, नंतर पत्नी अ‍ॅड. नमिता नाईक आणि स्वत: प्रशांत नाईक या तिघांनी अलिबाग शहराच्या नागरिकांबरोबर राजकारणाच्या चौकडी पलीकडे जाऊन व्यक्तिगत नाते निर्माण केले आहे. नाईक यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत नगरसेवक वा नागरिक यांच्याकडून एकही तक्रार आली नसल्याने, सर्वानुमतेच त्यांची नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निश्चिती केली असल्याचे त्यांनी सांगितले.
शहराच्या हद्दीत २४ किमी लांबीचे रस्ते आहेत, त्यापैकी १२ ते १३ किमीचे रस्ते काँक्रीट व पेव्हरब्लॉकचे करण्याचे काम नगरपरिषदेने केले आहे. रस्त्याच्या कामांकरिता आमदार पंडित पाटील यांनी पाठपुरावा करुन ५ कोटी रुपये आणले. शहरातील कचरा रात्री उचलणे आणि रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ करणे याबाबतचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी यावेळी
केली.
अलिबाग कोळीवाडा देखील अलिबागच्या ब्राम्हणआळीप्रमाणे स्वच्छ आणि सुरेख करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता कोळीवाड्यात एफएसआय ४ करुन आणण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. शहरातील मासळी बाजार आधुनिक पद्धतीने बांधून तो वातानुकूलित व स्वच्छ ठेवण्याचे नियोजन आमदार निधी व अन्य निधीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
>विजेसाठी १०० कोटी
३० वर्षांत अलिबाग शहरात पाणीपट्टी वाढविण्यात आलेली नाही. शहरात भूमिगत केबलद्वारे वीज पुरवठ्याच्या प्रकल्पासाठी १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. भूमिगत नाल्याची योजना कंत्राटदाराच्या अकार्यक्षमतेने प्रलंबित आहे. त्यासाठीचे २० कोटी रुपये नगरपरिषदेकडे जमा आहेत. येत्या काळात नव्या कंत्राटदाराच्या माध्यमातून ही योजना पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The peak's lead in the declaration of the candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.