चोटी गँग ! कल्याणमध्येही विद्यार्थिनीला बेशुद्ध करुन कापले केस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 06:11 PM2017-08-19T18:11:04+5:302017-08-19T19:37:40+5:30

उत्तर प्रदेश, हरियाणा, भिवंडी, नालासोपारा, डोंबिवलीपाठोपाठ चोटी गँग मुंबईतही आल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कल्याण-शहराच्या पूर्व भागातील गोविंदवाडी परिसरात राहणा-या 14 वर्षीय शाळकरी मुलीचे शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास केस कापण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

Peck! In case of Kalyan, the case is cut off by the girl | चोटी गँग ! कल्याणमध्येही विद्यार्थिनीला बेशुद्ध करुन कापले केस

चोटी गँग ! कल्याणमध्येही विद्यार्थिनीला बेशुद्ध करुन कापले केस

Next

कल्याण, दि. 19 -उत्तर प्रदेश, हरियाणा, भिवंडी, नालासोपारा, डोंबिवलीपाठोपाठ चोटी गँग मुंबईतही आल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कल्याण-शहराच्या पूर्व भागातील गोविंदवाडी परिसरात राहणा-या 14 वर्षीय शाळकरी मुलीचे शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास केस कापण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. या शाळकरी मुलीचे नाव सपना गुप्ता आहे. ती इयत्ता आठवीच्या वर्गात शिकते आहे. शुक्रवारी रात्री ती घरातील एक खोलीत अभ्यास करीत होती. तेव्हा ती अचानक बेशुद्ध पडली. ती बेशुद्ध पडल्याने तिच्या भावाचे तिच्याकडे लक्ष्य गेले. त्यावेळी तिचे केस कापण्यात आल्याचे त्याच्या निदर्शनास आले.  त्याने तिच्या तोंडावर पाणी मारुन तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेमुळे गोविंदवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी डोंबिवलीतील पिसवली व कल्याण मलंग रोडवर केस कापण्याचे दोन घटना घडलेल्या आहे. केस कापण्याच्या घटनांचे सत्र कल्याणमध्ये सुरुच आहे. 

‘चोटी गँग’ आता मुंबईतही

दरम्यान,  उत्तर प्रदेश, हरियाणा, भिवंडी, नालासोपारा, डोंबिवलीपाठोपाठ चोटी गँग मुंबईतही आल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रात्रीच्या अंधारात मुंबईतील तीन महिलांचे केस कापण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
भायखळा येथील मदनपुरा परिसरात फरिदा शेख (३९) मुलीसोबत राहतात. १२ आॅगस्ट रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास त्या घरात झोपल्या असताना अंगावरून काहीतरी सळसळत जात असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी लाइट लावून पाहताच त्यांचे अर्धे केस कोणीतरी कापल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड करताच शेजारी राहत असलेला अकबर हा भाऊ धावून आला. त्याने घराबाहेर आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे कोणीच नव्हते. या प्रकरणी अकबरने आग्रीपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
अशीच एक घटना १५ ऑगस्टला घडली. आग्रीपाडा येथील कालापाणी परिसरात रोशन खातुम (४०) राहतात. त्या घराबोहर झोपल्या होत्या. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांना जाग आली. त्यांनी डोक्यावरून हात फिरवला तेव्हा हातात अर्धवट कापलेली वेणी आल्याने त्यांनी घाबरून आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकताच पती नदिम घराबाहेर आले. मात्र तिथे कोणीच नव्हते. या प्रकरणी त्यांनीही आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. असाच एक प्रकार १६ आॅगस्टला वडाळ्यात घडला. अनिता शर्मा केस विंचरत असताना त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार आला. त्या झोपून उठल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की कोणीतरी त्यांची वेणी कापून टाकली आहे. या घटनांमुळे अफवांचे पीक आले आहे.
>अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. घडलेल्या घटनांचा सखोल सुरू असून लवकरच सत्य उजेडात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
>अंधश्रद्धा किंवा विकृती
अंधश्रद्धा, किंवा विकृतीतून या घटना घडत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटना कितपत खºया आहेत याची शहानिशा सुरू आहे.
 

Web Title: Peck! In case of Kalyan, the case is cut off by the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.