पेण नगरपालिका मान्सूनपूर्व कामांत व्यस्त

By admin | Published: May 16, 2016 03:22 AM2016-05-16T03:22:43+5:302016-05-16T03:22:43+5:30

अंडर ग्राउंड इलेक्ट्रिसिटी योजनेच्या कामासाठी शहरात रस्त्यांवर केलेले खादकामया अनुषंगाने ज्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे

Peen municipality busy pre-monsoon work | पेण नगरपालिका मान्सूनपूर्व कामांत व्यस्त

पेण नगरपालिका मान्सूनपूर्व कामांत व्यस्त

Next

पेण : पेण पालिकेच्या मान्सूनपूर्व विकासकामांची लगबग सुरू आहे. नालेसफाई, पाणीपुरवठा टप्पा क्र. २ या मुख्य कामांबरोबर शहरातील अंडर ग्राउंड इलेक्ट्रिसिटी योजनेच्या कामासाठी शहरात रस्त्यांवर केलेले खादकामया अनुषंगाने ज्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्या रस्त्यांबरोबर शहरातील पाच भागांतील मुख्य रस्त्यांना असलेले जोडरस्ते अशा छोट्या-मोठ्या २५ रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे शीघ्रगतीने सुरू आहेत. यासाठी पेण पालिका प्रशासनाने तब्बल २ कोटी ५० लाख ७२ हजार ५२१ रुपयांच्या अंदाजपत्रकीय रक मेची तरतूद केल्याचे सूत्रांनी सांगितले.
पेण पालिका प्रशासनाने हे वर्ष शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवी वर्ष व पालिका निवडणुकीचे वर्ष असल्याने शहरातील विकासकामांची मोठी जंत्रीच प्रशासनाने तयार केली आहे. यापूर्वी झालेली विकासकामे, मान्सूनपूर्व कामे व प्रस्तावित अनेक विकासकामे करण्यात प्रशासन मग्न आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या डांबरीकरण कामावर पेण पालिकेचा बांधकाम विभाग मान्सूनपूर्व उरकण्यासाठी झटत आहे.
रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी पालिका बांधकाम विभागाने पाच भाग केले असून, भाग १ मधील ७ रस्त्यांच्या कामावर ३५ लाख ६१ हजार ८६१ रु. यामध्ये अंतोरा रोड, शासकीय विश्रामगृह ते प्रायव्हेट हायस्कूल, डॉ. आंबेडकर चौक ते शिवाजी चौक, दातार आळी ते देवधर पथ, चावडी नाका ते अमलानंद मठ, शंकरनगर या रस्त्यांचा समावेश असून, यातील मोठ्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. भाग २ मधील १८ मीटर चिंचपाडा रस्ता, देवनागरी ब्रिजचा १२ मीटरचा रस्ता व कवंढाळ तलाव रिंग रोड रस्त्याची कामे पूर्ण झाली असून, यासाठी ४१ लाख १९ हजार ४२७ रुपयांची तरतूद आहे. भाग ३ मधील १२ रस्त्यांच्या कामांवर ४७ लाख १ हजार ११ रुपयांची तरतूद केली असून, यामध्ये चिंचपाडा रस्ता ते प्राजक्ता सोसायटी, फणस डोंगरी, देव आळी, प्रभू आळी, न. पा. शाळेजवळ तरे आळी, शंकरनगर गार्डनसमोर, शंकरनगर मेन रोड, विक्रम स्टँड ते सिद्धिविनायक, राजू पोटे मार्ग ते जनता स्टोअर्स, अभिनव सोसायटी, खान मोहल्ला मशीद ते जाधव सलुनीपर्यंत कामाचा समावेश आहे. (वार्ताहर)

Web Title: Peen municipality busy pre-monsoon work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.