DGIPR अधिकाऱ्यांचा इस्त्रायल दौरा कशासाठी?; ‘त्या’ व्हायरल पत्रावर फडणवीस म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 11:04 PM2021-07-21T23:04:48+5:302021-07-21T23:05:42+5:30

डीजीआयपीआरमधील अधिकाऱ्यांच्या दौऱ्याबद्दलचं इस्त्रालयच्या मुंबईतील दूतावासाचं पत्र समोर

Pegasus Spyware row bjp leader devendra fadnavis reaction on Dgipr Delegation Israel Visit | DGIPR अधिकाऱ्यांचा इस्त्रायल दौरा कशासाठी?; ‘त्या’ व्हायरल पत्रावर फडणवीस म्हणतात...

DGIPR अधिकाऱ्यांचा इस्त्रायल दौरा कशासाठी?; ‘त्या’ व्हायरल पत्रावर फडणवीस म्हणतात...

Next

मुंबई: पेगॅससच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांमध्ये देशातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. पेगॅसस स्पायवेअर तंत्रज्ञानाचा वापर करून केंद्रीय मंत्री, न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन हॅक होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेगॅससचा वापर करून महाराष्ट्रातील नेत्यांचे फोनदेखील हॅक केले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी मोदी सरकारवर केले आहेत. त्यातच मंत्रालयाच्या माहिती आणि जनसंपर्क खात्यातील ५ अधिकारी राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना इस्रायलमध्ये गेल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. याच संदर्भात आता मोठा खुलासा समोर आला असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

डीजीआयपीआरच्या अधिकाऱ्यांचा इस्रायल दौरा माध्यमविषयक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठीच आयोजित करण्यात आल्याचं पत्र व्हायरल झालं आहे. हे पत्र इस्त्रायल दूतावासाचं आहे. सप्टेंबर २०१९मध्ये हा दौरा नियोजित होता. मात्र हा दौरा प्रत्यक्षात नोव्हेंबर २०१९मध्ये झाला. हा दौरा माध्यमविषयक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षण आणि अभ्यासासाठी होता अशी माहिती आता समोर आली आहे. या दौऱ्यासंदर्भातलं इस्त्रालयच्या मुंबईतील दूतावासाकडून तत्कालीन सचिव ब्रिजेश सिंह यांना पाठवण्यात आलेलं पत्र समोर आलं आहे. 

इस्त्रायल दूतावासाकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात डीजीआयपीआरचं शिष्टमंडळ इस्त्रायलमध्ये कोणत्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे त्याची यादी आहे. त्यात सरकारी जनसंपर्काचे नवीन ट्रेंड्स समजून घेणे, वेब मीडिया वापराचे नवे मार्ग अभ्यासणे, डिजीटल मार्केटिंग, मध्यमांचा वापर, स्मार्ट सिटीमध्ये सरकारी जनसंपर्क यंत्रणेची भूमिका, सायबर क्राईम आणि सायबर सेक्युरिटीसंदर्भात नागरिकांना प्रशिक्षित करणे, ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यमांचा वापर करणे अशा विषयांचा समावेश आहे.

फडणवीस यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण
“डीजीआयपीआरचा इस्त्रायल दौरा हा मीडियातील बेस्ट प्रॅक्टिसेसच्या अभ्यासासंदर्भात होता. हा दौरा १६ नोव्हेंबर २०१९ रोजी सुरू झाला. त्यामुळे तो राज्यात सरकार अस्तित्त्वात नसतानाच्या काळात झाला होता. काल यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राज्यात कृषी विभागातर्फे शेतकर्‍यांचे इस्त्रायल दौरे नेहमी आयोजित केले जातात, तसाच हा दौरा डीजीआयपीआरतर्फे मीडिया बेस्ट प्रॅक्टिसेसच्या अभ्यासासंदर्भात होता, असेच देवेंद्र फडणवीस यांना सांगायचे होते”, असे त्यांच्या कार्यालयासंदर्भात सांगण्यात आले.

Web Title: Pegasus Spyware row bjp leader devendra fadnavis reaction on Dgipr Delegation Israel Visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.