पनवेल पालिकेची दंडात्मक कारवाई

By admin | Published: January 18, 2017 03:10 AM2017-01-18T03:10:02+5:302017-01-18T03:10:02+5:30

पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी नवीन पनवेल शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

Penal action of Panvel Municipal | पनवेल पालिकेची दंडात्मक कारवाई

पनवेल पालिकेची दंडात्मक कारवाई

Next


पनवेल : पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी नवीन पनवेल शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. यापुढेही शहरात अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, खारघर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. फुटपाथ, रस्ते, मोकळ्या जागा गिळंकृत करण्यात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी आयुक्तांनी पनवेल शहरातील अतिक्र मण काढण्यास सुरु वात केली होती. त्याचा धसका घेत नवीन पनवेल शहरातील काही फुटपाथ रिकामे झाले होते. मात्र कारवाईस काहींनी विरोध करण्यास सुरुवात केल्याने काही काळ ही कारवाई थंडावली. आता पुन्हा अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मंगळवार सकाळपासून आयुक्तांनी स्वत: उपस्थित राहून नवीन पनवेल येथील शिवा कॉम्प्लेक्स, अभ्युदय बँक परिसर, एचडीएफसी सर्कल, शबरी हॉटेल या भागात अतिक्र मण हटाव मोहीम सुरू केली.
शहरातील अनेक गाळेधारकांनी दुकानाच्या नावाच्या पाट्या पुढे लावलेल्या आहेत. तसेच फुटपाथवरही अतिक्रमण केले आहे. मंगळवारी हे सर्व अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली. काहींनी अतिक्रमण काढण्यास मुदत मागितली, मात्र त्यांचे न ऐकता आयुक्तांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. शहरातील सेक्टर १ येथील महाराष्ट्र नंबर १ सेल, नवरत्न मेडिकल यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी ५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. आयुक्तांनी शहरात कारवाईला सुरु केल्याचे समजताच काहींनी स्वत:हून अतिक्र मण काढले. (वार्ताहर)
>खारघरमध्ये आयुक्तांची कारवाई
पनवेल पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी रविवारी रात्री धडक कारवाई करत पदपथावरील फेरीवाल्यांना हटविले. यावेळी अतिक्र मण करून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांकडून दोन लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला.
खारघर परिसरात फेरीवाल्यांनी आणि काही दुकानदारांनी पदपथावर ठाण मांडल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी केलेल्या पाहणीत आढळले.
रविवार रात्री आठ ते दहा दरम्यान बँक आॅफ इंडियाच्या परिसरात कारवाई केल्यानंतर सोमवारी सकाळी सेक्टर ३0 ओवा गाव परिसर, सेन्ट्रल पार्ककडून प्रणाम हॉटेलकडे जाणारा रस्ता तसेच सेक्टर २0, २१ मधील पदपथावर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करून सामान जप्त करण्यात आले.
डिसेंबर महिन्यात आयुक्तांनी रस्त्यालगतच्या गॅरेज व्यावसायिकांवर कारवाई करून हा रस्ता मोकळा केला होता.
>गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणधारकांनी जागा बळकावली होती. त्यामुळे पादचारी, वाहनचालकांची गैरसोय होत होती. शहरही विद्रूप झाले होते. या कारवाईमुळे फेरीवाले, दुकानदार, गाळेधारकांकडून नाराजी व्यक्त होत असली तरी नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
- डॉ. सुधाकर शिंदे,
आयुक्त,
पनवेल महापालिका

Web Title: Penal action of Panvel Municipal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.