१७८ चालकांवर ड्रंक अ‍ँड ड्राइव्ह मोहिमेंतर्गत दंडात्मक कारवाई

By admin | Published: January 1, 2017 09:54 PM2017-01-01T21:54:34+5:302017-01-01T21:54:34+5:30

थर्टी फर्स्टची पार्टी करून मद्याच्या नशेत वाहन चालविणाऱ्या १७८ चालकांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह मोहिमेंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Penal action under the drunk and drive campaign on 178 drivers | १७८ चालकांवर ड्रंक अ‍ँड ड्राइव्ह मोहिमेंतर्गत दंडात्मक कारवाई

१७८ चालकांवर ड्रंक अ‍ँड ड्राइव्ह मोहिमेंतर्गत दंडात्मक कारवाई

Next

ऑनलाइन लोकमत

पिंपरी-चिंचवड, दि. १ - थर्टी फर्स्टची पार्टी करून मद्याच्या नशेत वाहन चालविणाऱ्या १७८ चालकांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह मोहिमेंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहराच्या प्रमुख चौकांत, तसेच हॉटेलातून बाहेर पडणाऱ्या मार्गावर वाहतूक पोलिसांनी ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या साह्याने वाहनचालकांची तपासणी केली. त्यात मद्याच्या अमलाखाली अनेक जण आढळून आले.

३१ डिसेंबरच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जणांनी हॉटेल, पब, ढाबे आदी ठिकाणी दारू पिऊन रस्त्यावर वाहने चालवली. मद्याच्या धुंदीत त्यांचे वेगावर नियंत्रण राहत नाही. परिणामी अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात; याला आळा बसावा, याकरिता वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली.

पिंपरी ३७, चिंचवड ११, निगडी १६, भोसरी १४, चतु:शृंगी १४, सांगवी २० आणि हिंजवडी परिसरात ६६ मद्यपी चालकांवर दंडात्मक कारवाई केली. आयटी परिसर असलेल्या हिंजवडी परिसरात सर्वाधिक ६६ मद्यपींवर कारवाई करण्यात आली आहे, तर चिंचवड परिसरात सर्वांत कमी ११ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहन परवाना न बाळगणाऱ्या, बेकायदा वाहतूक करणाऱ्या ११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Penal action under the drunk and drive campaign on 178 drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.