अस्वच्छता पसरवल्यास दंड!

By admin | Published: September 24, 2016 01:39 AM2016-09-24T01:39:36+5:302016-09-24T01:39:36+5:30

मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून ‘स्वच्छ रेल-स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत १७ सप्टेंबरपासून स्वच्छता सप्ताह साजरा केला जात

Penalties for spreading dirtyness! | अस्वच्छता पसरवल्यास दंड!

अस्वच्छता पसरवल्यास दंड!

Next


मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून ‘स्वच्छ रेल-स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत १७ सप्टेंबरपासून स्वच्छता सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहांतर्गत रेल्वे हद्दीत अस्वच्छता पसरवणाऱ्या प्रवाशांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला जात असून सात दिवसांत १ हजार ९६७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. हा सप्ताह २५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून स्वच्छता सप्ताह साजरा करताना स्थानक, लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्या, रेल्वे कॉलनीमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. तसेच कार्यालय परिसर, लोको शेड व कारखान्यांमध्येही स्वच्छता सप्ताह साजरा केला जात आहे. यानिमित्ताने साफसफाई मोहीम करतानाच जनजागृतीचे कार्यक्रमही केले जात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे स्वच्छता सप्ताह साजरा करतानाच अस्वच्छता पसरवणाऱ्या प्रवाशांविरोधातही कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यानुसार मध्य रेल्वेवर अस्वच्छता पसरवणाऱ्या १,०९९ प्रवाशांना पकडण्यात आले आणि त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून ३ लाख एवढा दंड वसूल करण्यात आल्याचे महाव्यवस्थापक अखिल अग्रवाल यांनी सांगितले. १९७ मेल-एक्स्प्रेस ट्रेनपैकी विदर्भ एक्स्प्रेस, दुरोन्तो एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, जीटी एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस, अनुव्रत एक्स्प्रेस, एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस आणि अन्य काही ट्रेनमधील जवळपास १५ हजार ७५१ प्रवाशांशी स्वच्छतेबाबत संपर्क साधण्यात आला. त्यातून १९२ जणांनी स्वच्छतेविषयी तक्रारी केल्या आणि यातील जवळपास १६८ तक्रारी सोडवल्याचे त्यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेवरही अशाच प्रकारची कारवाई करताना ८६८ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून ८६ हजार रुपये एवढा दंड वसूल केल्याचे साहाय्यक विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>पश्चिम रेल्वेवर ३,१०० जणांवर कारवाई
अस्वच्छता पसरवल्याने आॅगस्ट महिन्यात पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांत केलेल्या कारवाईत ३,१०० प्रवासी रेल्वेच्या जाळ्यात अडकले. त्यातून पश्चिम रेल्वेला ३.३९ लाख रुपये दंड मिळाला. स्वच्छता मोहिमेबाबत रेल्वे बोर्डाच्या आदेशानंतर पश्चिम रेल्वेने चतु:सूत्री अमलात आणली आहे.
त्यानुसार जनजागृती, सुविधा पुरवणे, उपाययोजना आणि दंड आकारला
जात आहे. पश्चिम रेल्वेवर दर दिवशी १०० ते १२५ प्रवाशांकडून दंड
वसूल केला जातो. रेल्वे बोर्ड नियमानुसार दंड १०० ते ५०० रुपये एवढा आकारला जाऊ शकतो. यातील पहिल्या टप्प्यात १०० रुपये दंड जागेवरच आकारला जात आहे.

Web Title: Penalties for spreading dirtyness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.