लोणावळ्यात हॉटेल व्यावसायकाला ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन न दिल्याने दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 04:10 PM2017-11-12T16:10:08+5:302017-11-12T16:16:05+5:30

वारंवार सुचना व माहिती देऊनही ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन न देणार्‍या एका हॉटेल व्यावसायकावर शनिवारी लोणावळा नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई केली. पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेले लोणावळा शहर स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने कंबर कसली असून नागरिकांनी देखिल यामध्ये मोठा सहभाग दिला आहे.

Penalty for not giving auction of wet and dry waste to hotel makers in Lonavla | लोणावळ्यात हॉटेल व्यावसायकाला ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन न दिल्याने दंड

लोणावळ्यात हॉटेल व्यावसायकाला ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन न दिल्याने दंड

Next
ठळक मुद्देलोणावळा नगरपरिषदेची कारवाईलोणावळा शहराला मानांकन मिळावे याकरिता स्वच्छतेबाबत जनजागृतीजे कचरा वर्गीकरण करुन देत नाहीत त्यांच्यावर कारवाई

लोणावळा : वारंवार सुचना व माहिती देऊनही ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन न देणार्‍या एका हॉटेल व्यावसायकावर शनिवारी लोणावळा नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई केली. पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेले लोणावळा शहर स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने कंबर कसली असून नागरिकांनी देखिल यामध्ये मोठा सहभाग दिला आहे.

2018 मध्ये देशभरात होणार्‍या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये लोणावळा शहराला मानांकन मिळावे याकरिता शहरात सर्वत्र स्वच्छतेबाबत जनजागृती, लोकसहभागातून परिसराची स्वच्छता, स्वच्छतागृहां‍ची देखरेख, शाळांमध्ये प्रबोधन, गावठाण भाग व सोसायट्यांमध्ये प्रबोधन, शहरात कोठेही कचर्‍यांचे ढिग, घाण, सांडपाण्याचे प्रवाह दिसणार नाही याकरिता टिम कार्य करत आहे.

सोबतच नागरिकांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन द्यावा यासाठी विविध माध्यमातून जनजागृती सुरु असताना देखिल जे नागरिक व व्यावसायीक कचरा वर्गीकरण करुन देत नाहीत त्यांच्यावर लोणावळा नगरपरिषदेने आता दंडात्मक कारवाई मोहिम सुरु केली आहे.

तुंगार्ली येथिल ईम्परिअल ग्रॅन्ड या हॉटेलवर शनिवारी पहिली दंडात्मक कारवाई करत पाचशे रुपये दंड वसुल करण्यात आला. नागरिकांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेण्यासोबत निर्माण झालेला कचरा हा ओला व सुका असा वर्गीकृत करुन देणे अपेक्षित आहे.

आपला परिसर व शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकांची जबाबदारी आहे मात्र वारंवार सुचना करुन देखिल जर कोणी कचरा वेगळा करुन देत नसल्याने त्यांच्यावर देखिल अशीच कारवाई करण्यात येईल असे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी स‍ांगितले.
 

Web Title: Penalty for not giving auction of wet and dry waste to hotel makers in Lonavla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.