इंग्रजी भाषेतून न शिकविल्याबद्दल दंड
By admin | Published: September 21, 2014 12:13 AM2014-09-21T00:13:42+5:302014-09-21T00:13:42+5:30
इंग्रजी भाषेत न शिकविल्या मुळे तक्रारदार विद्यार्थिनीला भरलेली रक्कम परत देण्यात यावी, असा आदेश एका कोचिंग क्लासला ग्राहक मंचाने दिला.
Next
पुणो : इंग्रजी भाषेतून क्लास घेतला जाईल, असे प्रवेश घेताना आश्वासन देऊनही इंग्रजी भाषेत न शिकविल्या मुळे तक्रारदार विद्यार्थिनीला भरलेली रक्कम परत देण्यात यावी, असा आदेश एका कोचिंग क्लासला ग्राहक मंचाने दिला.
पुणो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य मोहन पाटणकर, क्षितिजा कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. याप्रकरणी विधी केतन वखारिया हिच्यातर्फे तिचे वडील केतन कीर्तीकुमार वखारिया यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती. वखारिया यांनी विद्यासागर क्लासेस (प्रगती भवन, घोलेरोड) यांच्याविरुद्ध मंचाकडे तक्रार दाखल केली होत. वखारिया यांची मुलगी विधी ही दहावी पास झाली होती. त्यानंतर पुढील प्रवेशपरीक्षा देण्यासाठी त्यांनी विद्यासागर क्लासेसमध्ये चौकशी केली होती. तिचे सर्व शिक्षण कॉन्व्हेंट शाळेत झाल्यामुळे, तिला इंग्रजी भाषेतून शिकणो सोपे जाणार होते. त्याबाबत त्यांनी संबंधित क्लासला सांगितले होते. त्यांनी तिला काही अडचण येणार नाही, असे सांगण्यात आले.
त्यानुसार तक्रारदार वखारिया यांनी क्लाससाठी 88,792 रुपये शुल्क भरून 21 जुलै 2क्11 रोजी कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला. आठ ऑगस्टपासून तिने क्लासला जाण्यास सुरुवात केली. मात्र, इंग्रजीत शिकविण्यात येत नसल्यामुळे समजण्यास अडचण येत होती. त्याबद्दल तिने संबंधितांना सांगितले. मात्र, तिच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र, पॉलिसी नुसार पैसे परत देत नसल्यामुळे क्लासतर्फे त्यांना प्रतिसाद देण्यात आला नाही. आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी वखारिया यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली.
(प्रतिनिधी)
4याप्रकरणी विद्यासागर क्लासला नोटीस पाठविण्यात आली होती; मात्र त्यांच्यातर्फे मंचापुढे कोणी हजर राहिले नाही. क्लासमध्ये इंग्रजीतून शिकविण्यात येईल, असे सांगण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात इंग्रजीतून शिकविण्यात आले नाही. शिकविलेले समजण्यास अडचण येत असल्यामुळे, तिला क्लास सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. क्लासतर्फे सेवा देण्यात त्रुटी राहिली असल्याचे यावरून स्पष्ट असल्याचे मंचाने निकाल देताना नमूद केले.
4तक्रारदार यांनी क्लाससाठी भरलेल्या शुल्कापैकी प्रवेश शुल्क वगळून सहा महिन्यांच्या आत परत देण्यात यावी. तसेच, तक्रारदाराला नुकसानभरपाई म्हणून पाच हजार रुपये देण्यात यावेत, असा आदेश ग्राहक मंचाने दिला.