अश्लील एसएमएस प्रकरणी दीड लाख रूपयांचा दंड

By admin | Published: May 5, 2016 01:38 AM2016-05-05T01:38:10+5:302016-05-05T01:38:10+5:30

मेव्हणीलाच अश्लील वेबसाईटवरून एसएमएस पाठवणाऱ्या मेव्हण्यावर नोंदवण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयाने त्याला दीड लाखांचा दंड ठोठावला आहे. आधी दंड भरा

Penalty for one and a half lakh rupees | अश्लील एसएमएस प्रकरणी दीड लाख रूपयांचा दंड

अश्लील एसएमएस प्रकरणी दीड लाख रूपयांचा दंड

Next

मुंबई : मेव्हणीलाच अश्लील वेबसाईटवरून एसएमएस पाठवणाऱ्या मेव्हण्यावर नोंदवण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयाने त्याला दीड लाखांचा दंड ठोठावला आहे. आधी दंड भरा मगच गुन्हा रद्द करू, असे म्हणत उच्च न्यायालयाने मेव्हण्याला शेतकऱ्यांना सहाय्य करणाऱ्या नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ फाऊंडेशनच्या नावे दीड लाखाचा चेक गुरुवारी उच्च न्यायालयात सादर करण्याचा आदेश दिला.
अनिता शिंदे (बदलेले नाव) या व्यावसायिका असून त्यांचे मुख्य कार्यालय नागपूर येथे आहे, तर अंधेरी येथे त्यांच्या कार्यालयाची शाखा आहे. अनिता घरूनच काम करतात. अनिता यांना काही महिन्यांपूर्वी मकान डॉट कॉम या संकेतस्थळावरून त्यांच्या मोबाईलवर सतत अश्लील एसएमएस येत होते. त्यांच्या भावाने याविरुद्ध मकानच्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली. त्यानंतर रात्री-अपरात्री कॉलही येऊ लागले. असाच एक एसएमएस अनिता यांच्या मेव्हण्यालाही आला. या एसएमएसवरून अनिता यांना संशय आला. त्यानंतर आणखी एक एसएमएस अनिता यांच्या वडिलांना आला. या संदर्भात अनिता यांच्या भावाने मकान डॉट कॉमला मेल केला. मकानने अनिता, त्यांचा मेव्हणा आणि वडिलांचा मोबाईल नंबर ब्लॉक केला.
या प्रकरणी अनिता यांनी धारावी पोलीस ठाण्यात तक्रार केली. अश्लील एसएमएस करणारा नागपूरचा असल्याचे तापासातून उघडकीस आले.गुन्हा रद्द करण्यासाठी या दोघांनीही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सांजस्याने हे प्रकरण मिटले असून गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी आरोपींनी केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे या याचिकवर सुनावणी होती. (प्रतिनिधी)

Web Title: Penalty for one and a half lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.